-
सोशल मीडियावररील इन्स्टाग्राम युजर मनप्रीत कौरने चारकोल मास्कऐवजी कोळशाच्या मास्कचा स्वस्त पर्याय सुचवला. (फोटो सौजन्य : Freepik )
-
इन्स्टाग्राम युजर व्हिडीओत म्हणाली की, तिने चारकोल मास्ककधीच विकत घेतला नाही. तिने घराजवळच्या व्यक्तीकडून कोळसा घेतला. त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले. त्यानंतर हे सर्व एका भांड्यात काढून घेतलं. (फोटो सौजन्य : Freepik )
-
त्यात अर्ध्या लिंबाचा रस घातला आणि तीन ते चार तास झाकून ठेवलं. ते सुकल्यानंतर त्याला गाळून घेतले आणि ते पुन्हा फिल्टर केले. ती पुढे म्हणाली, हा नैसर्गिक चारकोल मास्क आहे. (फोटो सौजन्य : Freepik )
-
पण, हे त्वचेसाठी सुरक्षित आहे का याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने स्कीन केअर क्लिनिकमधील डर्मेटोलॉजिस् आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर शरीफा चाऊस यांच्याशी चर्चा केली. (फोटो सौजन्य : Freepik )
-
चारकोल मास्कमध्ये ॲक्टिव्हेटेड चारकोल असते. अति उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर तयार होणारी एक बारीक काळी पावडर असते; ज्यामुळे चेहऱ्यावर लावल्यानंतर त्याला थोडे छिद्र पडतात, ज्यामुळे ते चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स शोषून घेतात; असे डॉक्टर शरीफा चाऊस यांनी सांगितले. (फोटो सौजन्य : Freepik )
-
चारकोल मास्क त्वचेतील अशुद्धता काढून टाकण्यास मदत करतो, मुरुमांवर उपचार करतो. तसेच जास्त तेलकट त्वचेसाठी हा बेस्ट पर्याय आहे. पण, ज्यांची त्वचा सेन्सेटिव्ह किंवा कोरडी असेल त्यांनी चारकोल मास्क वापरणे टाळावे. (फोटो सौजन्य : Freepik )
-
चारकोल मास्कऐवजी कोळशाच्या मास्कचा उपयोग करणाऱ्या दावा नवी दिल्लीचे अभिवृत एस्थेटिक्सचे सह-संस्थापक, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि त्वचातज्ज्ञ जतिन मित्तल यांनी हा व्हायरल दावा खोडून टाकला आणि म्हणाले की, स्किनकेअर करण्यासाठी कोळशाचा वापर करणे हा योग्य मार्ग नाही. (फोटो सौजन्य : Freepik )
-
पण, याउलट चारकोल मास्कमध्येॲक्टिव्हेटेड चारकोल मिसळला जातो; जो त्वचेतील अशुद्धता, विषारी पदार्थ आणि डाग प्रभावीपणे काढून टाकतो; असे डॉक्टर मित्तल यांनी ठामपणे सांगितले. (फोटो सौजन्य : Freepik )
-
कोळसा, लिंबू मिसळून चेहऱ्यावर लावल्यास, त्वचेचा दाह होतो. तसेच अशा उपायांबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तुमच्या स्कीन केअरसाठी गूगल किंवा इन्स्टाग्राम युजर्सचे असे उपाय करून पाहू नका, त्वचेला इजा करू नका, त्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या… (फोटो सौजन्य : Freepik )

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?