-
जास्त ताण घेतल्याने आपल्या शरीरावर अनेक परिणाम आणि गंभीर आजार होतात. भारतात दरवर्षी जास्त कामामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे यामुळे अनेकदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो.
-
जाणून घेऊया अति तणावामुळे होणाऱ्या आरोग्यसमस्यांबाबत.
-
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतातील ६० टक्के लोक कामाच्या ओझ्यामुळे खूप थकलेले आणि चिंतेत आहेत. त्याच वेळी, २०१९ च्या एका अहवालात, मुंबई हे जगातील सर्वात मेहनती शहर होते.
-
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) च्या म्हणण्यानुसार, एका वर्षात भारतातील २ लाखांहून अधिक लोकांना जास्त कामामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. जास्त कामामुळे लोकं तणावाखाली राहतात. तणावाखाली जगणाऱ्या लोकांना अनेक गंभीर आजारांचा धोका असतो.
-
जास्त ताण घेतल्याने हृदयावर परिणाम होतो. जास्त ताणामुळे रक्तदाब आणि हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
-
तणावामुळे कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते ज्यामुळे वजन वाढते. अशा परिस्थितीत जास्त ताण घेतल्यास लठ्ठपणा येऊ शकतो. -
मधुमेह हा सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे जो जास्त ताण घेतल्याने देखील होऊ शकतो. -
जास्त ताणामुळे मायग्रेन होऊ शकतो, हा एक अतिशय धोकादायक आजार आहे यासोबतच सतत डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो. -
अति तणावाचा आपल्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा