-
जेव्हा आपल्या केसांमध्ये कोंडा होतो तेव्हा त्याच्यासोबत इतरही अनेक समस्या येतात. एकदा कोंडा झाला की, त्यातून सुटका करणे खूप कठीण होतं.
-
विशेषत: हिवाळा किंवा पावसाळ्याचे दिवसात कोंडा हा सर्वात त्रासदायक असतो.
-
जर तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधाशिवाय कोंडापासून मुक्ती मिळवायची असेल, तर कोंडा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
-
तुम्हाला कोंडापासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही हेअर स्टायलिंग उत्पादनांचा वापर कमी केला पाहिजे. जर तुम्ही हेअर स्टाइलिंगची उत्पादने जास्त प्रमाणात वापरत असाल तर कोंड्याची समस्या वाढू शकते.
-
केसांमधील कोंडा दूर करायचा असेल तर आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केस धुवावेत.
-
कोंडापासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही तुमच्या केसांवर कांद्याचा हेअर मास्क वापरू शकता.
-
कांद्यामधील अँटीफंगल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म नैसर्गिकरित्या कोंडा कमी करण्यास मदत करतात.
-
कांद्याचा हेअर मास्क तुमच्या डोक्यामध्ये रक्त प्रवाह आणि रक्ताभिसरण देखील सुधारतो.
-
हा मास्क तुम्ही सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता यासाठी फक्त एक कांदा घ्या आणि तो नीट बारीक करून डोक्याला लावा. नंतर ते सौम्य शैम्पूच्या मदतीने धुवा. (अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)
१०० वर्षांनंतर शनी गोचर अन् सूर्यग्रहणाचा दुर्मीळ संयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा; करिअर, व्यवसायात चमकेल नशीब