-
अक्रोडमध्ये भरपूर पोषक तत्व आढळतात असतात. अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते असे म्हटले जाते. हृदयरोगी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही अक्रोड फायदेशीर आहे. -
हृदयरुग्णांना आहाराकडे खूप लक्ष द्यावे लागते. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेले ड्राय फ्रूट म्हणजे अक्रोड. अक्रोडाचे सेवन हृदयरोग्यांसाठी रामबाण उपाय ठरू शकते. पण तुम्हाला माहीत आहे का एका दिवसात किती अक्रोड खावेत?
-
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फॉस्फरस, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात.
-
अक्रोडमध्ये आढळणारे ओमेगा-३ फॅटी ऍसिड शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. याचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यासही मदत होते.
-
अक्रोडमध्ये कॅलरीजही चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांचे जास्त सेवन केल्यास वजन वाढू शकते. वजन वाढण्यासाठी तुम्ही आहारात अक्रोडाचे समावेश करू शकता.
-
अक्रोडाचे सेवन मेंदूसाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. याचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. यामुळे मन शांत राहते आणि तणावातूनही आराम मिळतो.
-
दररोज ३० ते ६० ग्रॅम अक्रोड खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. म्हणजे तुम्ही एका दिवसात २ ते ३ अक्रोड खाऊ शकता.
-
अक्रोडमध्ये फायबरसोबत चांगल्या प्रमाणात हेल्दी फॅट्स असतात. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
-
अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस चांगल्या प्रमाणात असतात, ज्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. (अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य