-
झोपताना घोरणे (Snoring) ही एक सामान्य बाब आहे.
-
घोरणे ही आरोग्याशी संबंधित बाब असली तरी इतर अनेक आजारांशीही जोडलेली आहे.
-
घोरण्यामुळे उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) धोका वाढू शकतो, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.
-
जर एखाद्या व्यक्तीला घोरण्याने त्रास होत असेल तर त्याने त्याच्या रक्तदाबाचे निरीक्षण केले पाहिजे.
-
या संशोधनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
-
ऑस्ट्रेलियन संशोधकांनी घोरण्याने त्रस्त लोकांच्या समस्येचे एक नवीन कारण शोधून काढले आहे.
-
दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मते, जे लोक नियमित घोरतात त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो.
-
या संशोधनात असे म्हटले आहे की, जेव्हा रक्तवाहिन्यांमधील दाब खूप वाढतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो.
-
या स्थितीमुळे हृदयाला गंभीर नुकसान होऊ शकते आणि स्ट्रोक (Stroke), हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि इतर हृदयविकाराचे धोके (Heart Diseases) वाढतात.
-
जर एखाद्याला घोरण्याची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहनही केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels आणि FreePik)
-
(हेही पाहा : आठवड्यातून दोनदा छोलेची भाजी खाण्याचे फायदे)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा