-
सध्याच्या धावपळीच्या जीवनात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आरोग्य फायदे मिळू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
अनेक जण असा विचार करतात की, त्यासाठी चमचमीत पदार्थ सोडावे लागतील. पण, असं करण्याची गरज नाही. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असे स्नॅक्ससुद्धा आहेत, ज्याचे तुम्ही डाएट करताना सेवन करू शकता. तर कोणते आहेत ते स्नॅक्स जाणून घेऊ या…(फोटो सौजन्य : @Freepik )
-
१. नट्स व बिया : बदाम, अक्रोड, चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात; जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवून एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.(फोटो सौजन्य : @Freepik )
-
२. ताजी फळे : ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, बेरी ही फळे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, फायबर कन्टेंटचा आहार स्रोत आहेत; ज्यामुळे जळजळ कमी होते, हृदयरोगापासून तुमचे संरक्षण होते. तुम्ही या पदार्थांचा चविष्ट नाश्ता म्हणून किंवा ज्यूस किंवा स्मूदीमध्ये घालून सेवन केल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा होईल.(फोटो सौजन्य : @Freepik )
-
३. ओट्स व संपूर्ण धान्य : हे पदार्थ शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात. हा एक बेस्ट नाश्तादेखील आहे; ज्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते, पण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठीसुद्धा चांगले असते. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
४. भाज्या व हम्मस : हम्मस हा चणे, तिळाचे तेल, लिंबाचा रस आणि मिरी यांचा वापर करून बनवलेला एक चविष्ट पदार्थ आहे. गाजर, काकडी, भोपळी मिरचीचे तुकडे हम्मसमध्ये बुडवून खाल्ल्याने तुम्हाला हेल्दी फॅट्स व्यतिरिक्त फायबरदेखील मिळतात.(फोटो सौजन्य : @Freepik )
-
५. डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅवोनॉइड असतात; जे रक्ताभिसरण सुधारून रक्तदाब कमी करण्यात मदत करतात. यामध्ये ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त cocoa असतो, ज्यामुळे हे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
डार्क चॉकलेट एक आरोग्यदायी गोड पदार्थ आहे, जो तुमच्या गोड खाण्याच्या इच्छेला पूर्णही करतो आणि आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणामदेखील होऊ देत नाही. त्यामुळे, योग्य प्रमाणात खाल्ल्यास, डार्क चॉकलेट तुमच्या हृदयासाठी चांगले आहे. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
त्याचप्रमाणे चांगल्या कामांमध्ये गुंतून राहिल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य चांगले राखता येते. (फोटो सौजन्य : @Freepik )

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच