-
Butter Vs Margarine : अनेक वेळा आपण बाहेर पावभाजी, सॅण्डविच वगैरे खातो. त्यासाठी बटर किंवा लोणी वापरलं जातं. पण खरंच ते बटर असतं का? (Photo: Freepik)
-
सर्वसामान्य बटरमध्ये कोलेस्ट्रोल असतं, त्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते, म्हणून लाईट बटर विकलं जातं. वजनवाढ टाळण्यासाठी लाईट बटर खाण्याचा सल्ला दिला जातो. (Photo: Freepik)
-
पण, हे लाईट बटर आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? ते खाल्ल्यामुळे काय होतं? बटर आरोग्यासाठी पौष्टिक असतं की मार्जरीन? हे सगळं जाणून घेऊयात.(Photo: Freepik)
-
बटर म्हणजे काय? लोण्यामध्ये भरपूर प्रमाणात चरबी असते आणि A, D व K ही जीवनसत्त्वं कमी प्रमाणात असतात. त्याची मलईदार रचना आणि चव यांमुळे ते चवीच्या दृष्टीनं अनेकांच्या पसंतीस उतरतं. (Photo: Freepik)
-
लोणी हे व्हिटॅमिन एसारख्या चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वांचा नैसर्गिक स्रोत आहे, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यातून आपल्याला हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डीदेखील मिळतं.(Photo: Freepik)
-
मार्जरीन हा एक असा पदार्थ आहे, जो बटरसारखाच दिसतो; पण वास्तवात ते बटर नसते. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, मार्जरीन म्हणजे नक्की आहे तरी काय? मार्जरीन हा वनस्पती तेलापासून बनविण्यात आलेला पदार्थ आहे.(Photo: Freepik)
-
वनस्पती तेलाला आपल्याकडे डालडा म्हणूनही ओळखलं जातं. ज्याची आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होते. याचं मुख्य कारण म्हणजे ते स्वस्त असतं.(Photo: Freepik)
-
मार्जरीन हे बटर नसल्यामुळे त्यापासून आपल्या आरोग्याला काहीच लाभ मिळत नाहीत. त्याचे काही फायदे असले तरीही तोटेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर बटर आरोग्यासाठी पौष्टिक असतं.(Photo: Freepik)
-
बटरचं मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास आपल्या आरोग्याला हानी पोहोचत नाही; पण जास्त प्रमाणात बटर खाल्ल्यानं शरीराची अनेक प्रकारे हानी होऊ शकते.(Photo: Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”