-
तुम्हाला पाठदुखी आहे का? तुम्हाला शरीर जड किंवा शरीरात एखादी वेदना जाणवत आहेत का? असं असेल तर तुम्हाला दैनंदिन सवयींचे परीक्षण करावे लागेल. कारण संपूर्ण आरोग्यासाठी निरोगी शरीर राखणे खूप महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
एका कायरोप्रॅक्टरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका रीलने आम्हाला आरोग्य समस्यांची जाणीव करून दिली. कारण कायरोप्रॅक्टर स्वतःच्या दिनचर्येत कोणत्या गोष्टी टाळतेयाची यादी सांगितली आहे. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
त्यामुळे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने होलिस्टिका वर्ल्डचे संस्थापक, संचालक डॉक्टर धर्मेश शाह यांच्याशी संवाद साधला आणि कायरोप्रॅक्टरने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनीदेखील पाठीच्या आरोग्यासाठी योग्य मुद्रा व सक्रिय हालचाली कोणत्या असल्या पाहिजेत यावर भर दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
१. मांडी घालून बसणे : मांडी घालून बसणे अगदी वरवर आरामदायक वाटणारी स्थिती, पायांना रक्त प्रवाह प्रतिबंधित करते आणि पचनास अडथळा आणू शकते. चांगले रक्ताभिसरण व आराम मिळण्यासाठी तुमचे पाय जमिनीवर लांब ठेवून बसा. या मोकळ्या आसनाची निवड करा. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
२. तुम्ही पोटावर झोपता का? : काहींना पोटावर झोपणे ही सवय आरामदायी वाटत असले तरी पोटावर झोपल्याने तुमच्या मानेवर ताण येऊ शकतो आणि तुमच्या पाठीचा कणा असंतुलित करतो. त्यामुळे तुमचा मणका तटस्थ ठेवणारी झोपेची स्थिती निवडणे उत्तम आहे; जसे की तुमच्या पाठीवर किंवा बाजूला उशी ठेवून झोपणे. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
३. सूक्ष्म हालचाली : दिवसभरात सूक्ष्म हालचाली, लहान स्ट्रेच, पोश्चर ॲडजस्टमेंट हे पाठीच्या कण्यांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. या सूक्ष्म हालचालींचा तुमच्या दिनक्रमात समावेश करणे, विशेषत: जर तुमच्या नोकरीदरम्यान दीर्घकाळ एकाच जागेवर बसत असाल तर हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. उभे राहणे, वेळोवेळी साधे स्ट्रेचेस, हलक्या हालचाली केल्याने तुमचे सांधे वंगण ठेवण्यास आणि शरीरातील कडकपणा टाळण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
४. हालचालींना आलिंगन द्या, बसणे या कृतीशी लढा : बैठी जीवनशैली अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते. यामुळे नियमित हालचालींचे महत्त्व, कोणत्याही प्रकारात असो, कितीही सांगितले तरी कमीच आहे. त्यामुळे चालणे, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम आपल्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. हे बसण्याच्या नकारात्मक प्रभावांचा सामना करण्यास, मणक्याचे आरोग्य राखण्यास नक्कीच मदत करेल. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
लक्षात ठेवा, निरोगी पाठीचा कणा हा एकंदर शरीर कल्याणचा मुख्य घटक आहे, म्हणून वाईट सवयी सोडून द्या, हालचाली स्वीकारा आणि तुमच्या मणक्याला योग्य असलेलं प्रेम, काळजी द्या! (फोटो सौजन्य : @Freepik )
-
तुमची योग्य स्थिती लक्षात घेऊन, तुमच्या दिवसात नियमित हालचालींचा समावेश करून तुम्ही तुमच्या पाठीच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik )

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…