-
बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी हा खास व्यक्तींपैकी एक आहे, कारण त्याचे वय वाढत असतानासुद्धा तो दिवसेंदिवस तरुण दिसतो आहे. वयाच्या ६३ व्या वर्षीही त्याची शरीराची रचना खूपच चांगली आहे. पण, स्वतःला तंदुरुस्त ठेवणे सोपे नाही. कारण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / @suniel.shetty)
-
तर याचबद्दल प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या शोमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा फिटनेसचा मंत्र सांगितला आहे. त्याचा मंत्र हा आहे की, त्याच्या शरीराच्या रचनेचे ८० टक्के श्रेय तो ज्या पदार्थांचे सेवन करतो त्यांना देतो. सुनील शेट्टी घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करतो, तो बाहेरून पदार्थ ऑर्डर करत नाही. तसेच तो पांढऱ्या पदार्थांपासून दूर राहतो. जसे की, मीठ, साखर, भात.” (फोटो सौजन्य : @Freepik / इन्स्टाग्राम / @suniel.shetty)
-
याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एस्क्प्रेसने इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या आहारशास्त्रज्ञ विभागाच्या उपव्यवस्थापक, कनिका नारंग यांच्याशी संवाद साधला. त्यांनी ठळकपणे सांगितले की, पांढऱ्या पदार्थांचे मर्यादित सेवन केल्यास आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
शुद्ध कार्बोहायड्रेट्स, जसे की भात, व्हाईट ब्रेड यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे हे खाल्ल्यावर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्याचप्रमाणे जास्त साखरेचा वापर लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि दातांच्या समस्यांशी निगडीत असतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
फरीदाबाद येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या, डायरेक्टर इंटर्नल मेडिसिन अँड रुमॅटोलॉजी डॉक्टर जयंता ठाकुरिया यांनीसुद्धा या गोष्टीवर सहमती दर्शवली आहे. त्या म्हणाल्या की, “जास्त मिठाचा आहार दीर्घकालीन उच्च रक्तदाबात योगदान देऊ शकतो, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यामुळे मीठ, भात, साखर यांचे प्रमाण कमी करून तुम्ही संपूर्ण धान्य, फळे, भाज्या यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर पर्यायांची निवड करू शकता आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकता. एकूणच यामुळे तुमचा आहार सुधारेल आणि हृदयरोगाचा धोका कमी होईल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
अन्नातील सगळ्यात पहिला पांढरा पदार्थ म्हणजे मीठ. कारण मिठाचे सहसा जास्त सेवन केले जाते. पण, मिठाचे सेवन कमी करणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. अतिरिक्त सोडियम हे उच्च रक्तदाबात महत्त्वाचे योगदान देते, ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोकचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर दोन्ही आहारतज्ज्ञ संतुलन आणि विविधतेस प्रोत्साहन देतात. संतुलित आहार घेतल्याने शरीरास आवश्यक सर्व घटक मिळतात आणि आरोग्य चांगले राहते. पांढऱ्या भाताच्या ऐवजी किव्हा, ओट्स किंवा ज्वारीसारखे संपूर्ण धान्य उत्तम पर्याय आहेत. कमी फॅट किंवा स्किम दूधही अनेक फायदे देते. (फोटो सौजन्य : @Freepik)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा