-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, १५ नोव्हेंबरपर्यंत वक्री असणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच तो २८ मार्च २०२५ पर्यंत याच राशीत असेल. त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा १५८ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढील १५८ दिवस शुभ परिणाम घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीतील शनी मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी पुढील १५८ दिवस अत्यंत लाभदायी असेल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाल तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. १५८ दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा १५८ दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
![US Illegal Immigrants deported](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Latest-Marathi-News-2025-02-06T085413.429.jpg?w=300&h=200&crop=1)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा