बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी बदाम खाणे किती गरजेचे आहे हे आपल्याला नेहमी समजावले जाते. परंतु, या बदामाचा हा एकच उपयोग आहे का? बदामाचे विश्लेषण “संपूर्ण आरोग्यासाठी आदर्श बिया” यातून केले जाते.
अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्मांनी भरलेले असे हे बदाम आपल्या संपूर्ण शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहेत.
बदामामध्ये निरोगी चरबी किंवा फॅट्सचा समावेश असल्यामुळे ती कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात आणण्यास मदत करते आणि त्यामुळे हृदय निरोगी राहते.
२८.३५ ग्राम बदामामध्ये अंदाजे १६४ कॅलरी, ६ ग्राम प्रोटिन, १४ निरोगी फॅट्स आणि ३.५ ग्राम फायबर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असल्यामुळे बदाम हा आहारात समाविष्ट करून घेण्यासाठी एक आरोग्यसंपन्न घटक आहे.
भिजवलेल्या बदामाचे पाच निरोगी फायदे ; मेंदूचे योग्य चलन : बदाम मेंदूचे चलन सुधारण्यासाठी ओळखले जाते आणि जर भिजवलेले बदाम असले तर या सुधारणेवर आणखी भर पडते. व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडेंटने भरपूर भिजवलेले बदाम ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मुक्ती देते.
ऊर्जा पातळीत वाढ : भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने शरीराला दिवसभर उत्स्फूर्त ठेवण्याचे शक्ती मिळते. प्रोटीन आणि फायबर असल्यामुळे ऊर्जा शक्ती कायम ठेवण्यास मदत करते. बदामाचा आहार नियमितपणे केला तर हृदय विकारांशी लढण्यास मदत होते.
वजनात घट : वजन कमी करण्यासाठी बदामाची मदत होते. बदामामध्ये असलेल्या फायबर आणि प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे जास्त भूक लागत नाही आणि शरीरात कॅलरीचे प्रमाणही घटत जाते.
पोषणाने भरपूर : बदाम मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमने समृद्ध असतात, जे शरीराच्या विविध कार्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
बदाम भिजवल्यामुळे या पोषणतत्त्वांची शोषण क्षमता वाढते. भिजवलेले बदाम हे एक खूप पौष्टिक आणि ताकदीने भरलेलं स्नॅक बनतात, जे तुमचं एकूण आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतात.
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स/ पिक्साबे )
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)