तणावाने गजबजलेल्या या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराची काळजी आपणच उत्तमरित्या घेऊ शकतो आणि म्हणूनच आजच्या या सोप्या टिप्स त्वचेची चमक वाढविण्यासाठी आहेत.
हायड्रेशन : हायड्रेशन त्वचेला तरुण आणि मोकळे बनवतो. किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे, जे तुमच्या त्वचेला खुलून येण्यास मदत करते. हायलोरोनिक ॲसिड आणि ग्लिसरीनसारख्या घटकांना स्किनकेअर रुटीनमध्ये ओलावा जपण्यासाठी समाविष्ट करणे आवश्यक आहे.
नियमित आहार : त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी पोषणतत्व अत्यंत गरजेचे असते. अँटिऑक्सिडेंट, मिनरल आणि व्हिटॅमिन हे तत्व असलेले पदार्थ नियमित आहारात समाविष्ट केले तर त्वचेला उजळवण्यात मदत होते. हिरव्या भाज्या, फळं यांचा समावेश निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे.
सूर्यापासून रक्षण : सूर्यकिरणांमुळे त्वचेचा उजळपणा कमी होतो व वृद्धत्व चेहऱ्यावरून लवकर दिसून येते.
या परिणामांपासून दूर राहण्यासाठी एस पी एफ ३० चा समावेश असलेली सनस्क्रीन लावणे फायद्याचे आहे. ही सनस्क्रीन हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्याचे कार्य करते.
नियमित व्यायाम : योग्य रक्त परिसंचरणासाठी नियमित योग किंवा व्यायाम आवश्यक आहे, यामुळे ऑक्सिजन आणि पोषण त्वचेपर्यंत पोहोचण्याचे काम करते. किमान ३० मिनिटांचा व्यायाम दररोज त्वचेसाठी आणि शरीरासाठीही गरजेचा आहे.
योग्य झोप- त्वचेच्या दुरुस्तीसाठी आणि पुन्हा नव्याने उत्स्फूर्त होण्यासाठी योग्य प्रमाणात झोप ही गरजेची आहे. हे योग्य प्रमाण म्हणजे ७-८ तासांची झोप चेहऱ्याच्या बहारदार रूपासाठी आवश्यक आहे.
ओलावा- त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठीं योग्य मॉइश्चरायझरचा वापर करणे फायद्याचे ठरेल.
तणाव व्यवस्थापन- तीव्र ताण त्वचेवर वाईट प्रभाव पाडू शकतो. योग, ध्यान यांसारख्या तंत्रांनी त्वचेवरचीचमक कायम राहील.
(सर्व फोटो सौजन्य – पेक्सएल्स )
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)