-
महाराष्ट्रात तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
दिवाळीनंतर पुढील ४ दिवस आपण ज्याप्रमाणे घराबाहेर रांगोळी काढतो, दार आकर्षक दिवे आणि विद्युत रोषणाईने घर सजवतो अगदी तशीच सजावट तुळशी लग्नाच्या दिवशी केले जाते.
-
तुळशीच्या लग्नादिवशी दारासमोर आकर्षक तुळशी वृंदावनाची रांगोळी काढणे अनेकांना आवडते.
-
पण यंदा तुम्ही साधी रांगोळी न काढता तुम्ही वृंदावनाची लेटेस्ट रांगोळी काढू शकता आणि अंगणाची शोभा वाढवू शकता.
-
यासाठी दारासमोर अगदी ५ मिनिटांत काढता येऊ शकतात अशा काही सोप्या रांगोळी डिझाईन्स पाहूया.
-
तुळशीची पूजा ज्या ठिकाणी कराल तिथे तुम्ही या सोप्या रांगोळ्या काढू शकता.
-
तुम्ही तुळशी मातेची प्रतिकात्मक रांगोळी काढू शकता.
-
तुळशी विवाहाच्या दिवशी रांगोळी काढून मन प्रसन्न होईल आणि घराचीही शोभा वाढेल.
-
अगदी ५ ते १० मिनिटांत सुंदर तुळशी वृंदावणाची रांगोळी काढू शकता.
-
तुळशी वृंदावन काढल्यानंतर वरती शुभ विवाह असे लिहून तुम्ही पिवळ्या आणि भगव्या रंगाच्या मदतीने झेंडूची फुलांच्या आकाराचा वर्तुळ काढून एक सुंदर रांगोळी पूर्ण करु शकता.
-
बाजूने उसाच्या रोपाचे मंडप आणि मधे तुळशी वृंदावन असलेली ही डिझाइन काढू शकता.
-
रांगोळीच्या सुंदर रंगांचा वापर करुन तुम्ही सुखेर तुळशी वृंदानवाची रांगोळी डिझायन्स सजवू शकता.
-
जर तुम्हाला फार मोठ्या रांगोळ्या काढायला आवडत असतील तर ही रांगोळी काढू शकता. (फोटो – Facebook, Youtube, Instagram)
