दिवसभराच्या कामाच्या गोंधळात बऱ्याच वेळेला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
दिवसाची सुरुवात स्वतःच्या शरीराच्या आरोग्यासाठी देणे अत्यंत आवश्यक तसेच फायदेशीर ठरते.
यामुळे अखंड दिवस चांगला जातो, तसेच कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळही मिळते.
हायड्रेशन – शरीराला योग्य पाणीपुरवठा मिळाल्यास त्वचा ताजीतावनी राहण्यास मदत होते, डाग आणि अशुद्धतेशी लढण्यास मदत होते आणि दिवसभर काम करण्याची शक्ती राहते.
मनाची शांतता – एखाद्या शांत ठिकाणी डोळे बंद करून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष ठेवणे, त्याने ताण कमी करण्यात मदत होते. इतकच नाही तर ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते आणि मनाची शांती अनुभवता येते.
व्यायाम – कुठच्याही प्रकारचा योग किंवा व्यायाम केल्याने मन टवटवीत राहते व शरीराला जागृत ठेवते.
पौष्टिक आहार – नियमित व पौष्टिक आहार रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात आणते व शरीरातील शक्ती टिकवून ठेवते.
कृतज्ञता डायरी – दिवसभरातून थोडा वेळ काढून एका डायरीमध्ये दररोज कुठच्याही तीन गोष्टींचे आभार मानत लिहा, छोटी किंवा मोठी.
(सर्व फोटो सौजन्य ; पेक्सएल्स)
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)