-
Know About Masterdating or Solo Dating : प्रत्येक जण जोडीदारासोबत डेटवर जातो; पण कोणी कधी एकटा डेटवर जातो का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. एकट्याने डेटवर जाण्याला मास्टरडेटिंग म्हणतात; जे आजकाल सोशल मीडियावर खूप ट्रेंड करीत आहे.
-
सोलो डेटिंग फॉलो करणारे बरेच लोक याचा आनंद घेत आहेत. तसेच ते त्यांचे अनुभव एकमेकांशी शेअर करतात.
-
सोशल मीडियावर मास्टरडेटिंगचे फोटो शेअर करीत लोक एकमेकांना सांगतात, ”ते सोलो डेटिंगचा आनंद कसा घेत आहेत.” तुम्हालाही मास्टरडेटिंग किंवा सोलो डेटिंगबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.
-
डेटिंग तज्ज्ञ मेलिसा स्टोन, ज्या ट्रेंडिंग संकल्पनेचे समर्थन करतात, .
-
त्यांनी ‘ग्लॅमर यूके’ला सांगितले की, ”मास्टरडेटिंगचा सराव Me-Time म्हणजेच स्वत:साठी वेळ घालवण्यास आणि स्वतःच्या आवडी शोधण्यासाठी संधी देते;
-
ज्यामुळे लोकांना त्यांच्या आवडी शोधता येतात आणि त्यांना स्वतःला प्रोत्साहन देता येते
-
त्यांनी लोकांना डेटवर जाण्यासाठी आणि त्यांना आनंद देणाऱ्या ॲक्टिव्हिटी करण्यास प्रोत्साहित केले.
-
त्यांच्या मते, ”मास्टरडेटिंग ही अशी गोष्ट आहे की, जी एकट्याने गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि स्वतःच्या कंपनीचा आनंद घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
-
काहीही विचार न करता मास्टरडेटिंगचा आनंद घ्या
प्रसिद्ध डेटिंग प्रशिक्षक एमी नोबिल यांनी ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ला सांगितले, ”मास्टरडेटिंग म्हणजे तुमच्या इच्छा, गरजा व तुम्हाला आनंद देणार्या गोष्टींचा विचार करणे आणि समजून घेणे. ही बाब कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्या आत दडलेली तुमची स्वतःची आवड शोधण्यास मदत करते.” -
एमी नोबिल लोकांना सल्ला देते, ”मास्टरडेटिंग ट्रेंड फॉलो करताना जास्त विचार करण्याची, काळजी करण्याची किंवा सतर्क राहण्याची गरज नाही. काहीही विचार न करता फक्त सोलो डेटिंगचा आनंद घ्यायचा आहे.
-
जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले, तरच ते इतरांना तुमच्यावर प्रेम करण्यास आकर्षित करील.”
-
#MasterDating हा TikTok वर जगातील अनेक देशांमध्ये मोठा ट्रेंड बनला आहे आणि लोकांनी सोलो डेटिंगवर त्यांचे व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. (सौजन्य – फ्रिपीक)

Anaya Bangar: लिंगबदल केल्यानंतर क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीचा धक्कादायक दावा; अनाया बांगर म्हणाली, “क्रिकेटपटू मला नग्न फोटो…”