-
आपल्यातील अनेकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर गोड काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी घरात काही सफरचंद असतील, तर तुम्ही एक गोड पदार्थ बनवू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
सफरचंद, केळी ही फळंही भरपूर खाल्ली जातात, त्यामुळे या फळांचा तुमच्या रबडीमध्ये समावेश करा आणि स्वादिष्ट पाककृती बनवा. तर सफरचंदाची रबडी कशी बनवायची चला पाहू… (फोटो सौजन्य : @लोकसत्ता डॉट कॉम)
-
सफरचंदाची रबडी बनवण्यासाठी ५ किंवा ६ सफरचंद, छोटं पॅकेट मिल्क पावडर, दोन चमचा तूप, पाव लिटर दूध इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
सफरचंद स्वछ धुवून पुसून घ्या.त्यानंतर सफरचंदाचे तुकडे करा आणि किसणीवर किसून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
कढईत दोन चमचे तूप घाला.त्यात किसलेलं सफरचंद घाला आणि परतवून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
मिश्रण तोपर्यंत हलवत रहा, जोपर्यंत ते मऊ होत नाही किंवा त्याला तूप सुटत नाही. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यात पाव लिटर गरम दूध टाका.मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यानंतर त्यात मिल्क पावडर टाका.पाच ते दहा मिनिटे परतवून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
रबडी तयार झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. अशाप्रकारे तुमची सफरचंदाची रबडी (Apple Rabdi) तयार. (फोटो सौजन्य : @लोकसत्ता डॉट कॉम)
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral