-
मायग्रेन म्हणजे डोकेदुखी, जी जगभरातील लाखो लोकांना त्रास देते आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी अनेक उपाय आणि उपचार आहेत. त्यामधलाच एक उपाय म्हणजे गरम पाण्यात पाय भिजवणे हा आहे, ज्यामुळे काही लोकांना आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
डॉक्टर मायरो फिगुरा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या रीलमध्ये एका महिलेने दावा केला आहे की, “मला नुकतेच कळले की जर तुम्हाला मायग्रेन झाला असेल आणि तुम्हाला त्यातून लवकर सुटका हवी असेल, तर तुम्हाला सोयीस्कर वाटेल असं पाणी गरम करून त्यात तुमचे पाय बुडवा. यामुळे तुम्हाला आराम मिळण्यासाठी मदत होऊ शकते’. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर या दाव्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरूच्या सर्जापूर रोड येथील मणिपाल हॉस्पिटलचे न्यूरोलॉजी, एपिलेप्टोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार, हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर शिव कुमार आर यांच्याशी चर्चा केली. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
डॉक्टर शिव कुमार म्हणतात की, ही पद्धत पायांमधील रक्तवाहिन्या वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे रक्त डोक्यापासून पायांकडे जाण्यास मदत होते आणि यामुळे मायग्रेन वेदना (डोकेदुखी) कमी होते. कॉमन (सामान्य) मायग्रेन उपचारांमध्ये कोल्ड कॉम्प्रेस, हायड्रेशन, विश्रांती यांचा समावेश आहे. काही लोकांना ध्यान किंवा योगा यांसारख्या विश्रांतीद्वारेदेखील आराम मिळतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
या पद्धतीचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी डॉक्टर शिव कुमार यांनी काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे : १. पाणी तुम्हाला सहन होईल इतकंच गरम ठेवा. पाण्याचे तापमान सुमारे १०० ते १००°F ३७ ते ४३ डिग्री सेल्सियम (37-43°C) असावे, यामुळे रक्तवाहिन्या वाढण्यासाठी आणि डोक्यापासून रक्त काढण्यासाठी मदत होईल. यासाठी तुम्ही १५ ते २० मिनिटे पाय पाण्यात ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
२. मोठे बेसिन किंवा फूट बाथ (पाय धुण्याचे पात्र) वापरा, ज्यात दोन्ही पाय आरामात ठेवता येतील. एप्सम सॉल्ट एप्सम म्हणजे सैंधव मीठ किंवा लॅव्हेंडर तेल पाण्यात घाला, ज्यामुळे तुम्हाला जास्त आराम मिळेल. यावेळी अगदी आरामात बसा, तुमचं डोकं एकदम शांत ठेवा; गरम पाण्यात पाय बुडवल्याचा परिणाम अधिक चांगला येईल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
मायग्रेनचा त्रास अनुभवणाऱ्यांना गरम पाण्यात पाय भिजवणारी शारीरिक यंत्रणा (Migraine Relief Trick) कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेऊया…१. वासोडिलेशन : गरम पाण्यात पाय भिजवल्याने पायांमधील रक्तवाहिन्या वाढतात, ज्यामुळे डोक्यातील रक्ताचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, संभाव्यतः शरीरातील ताण कमी होतो, त्यामुळे डोकं दुखीचा त्रास कमी होऊ शकतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
२. थर्मोरेग्युलेशन : पाण्यातील उष्णता शरीराला तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. एक सुखदायक प्रभाव प्रदान करू शकते, जे मायग्रेनची लक्षणे कमी करून तुम्हाला आराम प्रदान करते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
३. मज्जासंस्था (Nervous System) : कोमट पाणी पायांमधील मज्जातंतूंच्या नसांना उत्तेजित करू शकते, जे मेंदूला सिग्नल पाठवून वेदना कमी करून तुम्हाला आराम देते. (फोटो सौजन्य : @Freepik)

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा