-
मसालेदार, तिखट पदार्थांचा हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याविषयी अनेकांची वेगवेगळी मते आहेत. काहींना विश्वास आहे की, हे पदार्थ खाल्ल्याने हृदयासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. तर काहींना या पदार्थांचे जास्त सेवन करणे हृदयासाठी घातक वाटते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
केअर हॉस्पिटल हायटेक सिटी, हैदराबाद येथील सल्लागार हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनोद यांच्या मते, मसालेदार, तिखट पदार्थांचे नियमित सेवन आणि हृदयविकाराचा झटका यांचा थेट संबंध नाही. खरं तर, मसालेदार पदार्थांचे मध्यम सेवन, विशेषत: कॅप्सेसिन असलेले अन्न अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मिरचीच्या उष्णतेसाठी जबाबदार असलेल्या कॅप्सेसिन या संयुगात शक्तिशाली दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. हे गुणधर्म जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करू शकतात, जे दोन्ही हृदयरोगाशी संबंधित आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
Capsaicin चयापचय वाढवू शकते, जे वजन व्यवस्थापनात मदत करू शकते आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकते. काही अभ्यासामध्ये असे सुचवले आहे की, कॅप्सेसिन रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते, हृदयावरील ताण कमी करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मसालेदार अन्न खाण्याचे अनेक फायदे आहेत; परंतु ते कमी प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे पचनाशी संबंधित समस्या आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते, ज्याचा अप्रत्यक्षपणे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
ज्या व्यक्तींना आधीपासून हृदयाशी संबंधित समस्या आहे किंवा ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे अशा व्यक्तींनी मसाल्यांचे सेवन जास्त प्रमाणात करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्हाला मसालेदार, तिखट पदार्थ खायला आवडत असेल, तर ते पदार्थ तुमच्या आहारात सुरक्षितपणे समाविष्ट करण्यासाठी डॉ. विनोद यांनी सांगितलेल्या काही टिप्स खालीलप्रमाणे (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुमच्या आहारात मसालेदार पदार्थांचा हळूहळू समावेश करा; जेणेकरून तुमचे शरीर समायोजित होईल. शिमला मिरची, केळी मिरची यांसारखे मसाले निवडा, जे जास्त उष्णता न देता चव देतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
दाहकविरोधी मसाल्यांचा वापर करा. जळजळ कमी करण्यासाठी तुमच्या स्वयंपाकात हळद, आले व लसूण यांसारखे गरम मसाल्यांचा वापर करा. पचनसंस्थेला शांत करण्यासाठी आहारात मसालेदार पदार्थांसोबत दही, अॅव्होकॅडो किंवा काकडीसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा. (फोटो सौजन्य: Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा