-
साखर किंवा गोड पदार्थांच्या सेवनामुळे फक्त मधुमेहच नाही तर लठ्ठपणा, फॅटी लिव्हर (fatty liver), लिपिडसंबंधित समस्या (lipid abnormalities) विशेषत: ट्रायग्लिसराइड्स (triglycerides), इन्सुलिन प्रतिकार (insulin resistance), उच्च रक्तदाब आणि हृदयाचे विकार होण्याचा धोकादेखील असतो. असे मानले जाते की, ऊसापासून तयार केलेली साखर प्रथम पॉलिनेशियामध्ये वापरली गेली होती, परंतु खड्यांसारखी चमकणारी ऊसापासून तयार केलेली साखर वापरण्याची वास्तविक प्रक्रिया भारतात विकसित झाली. त्यामुळेच आपल्याला साखर किंवा गोड खाण्याची एवढी इच्छा होत असावी का?
-
साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा कशामुळे होते?
साखर किंवा गोड खाण्याची इच्छा वाढवण्यात अनेक घटक भूमिका बजावतात. साखर किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्याने डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखे न्यूरोट्रांसमीटर शरीरात सोडले जातात, जे एक आनंददायी भावना निर्माण करतात आणि त्यानंतर अधिक गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. सेरोटोनिनची पातळी कमी असण्याचा संबंध नैराश्य, मूड बदणे, रजोनिवृत्ती (menopausal) किंवा मासिक पाळीसंबंधी समस्या (premenstrual syndrome) आणि दीर्घकाळ मद्यपान करणे अशा परिस्थितीशी जोडला जातो, ज्यामुळे साखर किंवा गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. तणाव, नैराश्य, चिंता किंवा अगदी साधा कंटाळा, तसेच त्यांच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्या औषधांमुळेदेखील साखरयुक्त पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. अशा परिस्थितीत साखर किंवा गोड खाण्याची इच्छा एक मानसशास्त्रीय गोष्ट ठरते, जी क्षणिक असली तरी तात्काळ मदत करते. -
पुरेशी झोप न मिळण्याचा देखील साखर किंवा गोड खाण्याची इच्छा वाढण्याशी संबंध आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरात सोडल्या जाणाऱ्या घ्रेलिन आणि लेप्टिनसारख्या हार्मोन्समुळे भूक लागणे आणि तृप्ततेची भावना मिळण्यावर परिणाम होतो. ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा देखील निर्माण होऊ शकते.
साखर किंवा गोड खाण्याची इच्छा ही फक्त एक प्रतिसाद किंवा सवय असू शकते. गोड पदार्थ खाणे हे सर्व चांगल्या गोष्टींशी निगडीत आहे. बर्याचदा बक्षीस म्हणून ते वापरले जाते आणि आपल्याकडे नेहमीच उत्सवाचा एक भाग म्हणून गोड पदार्थ वापरले जातात यामुळे साखर किंवा गोड पदार्थांचे सेवन करण्याची सवय होऊ शकते. त्याचे सेवन न केल्यास काहीतरी चुकल्याचे, कमी असल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त, अनेक जाहिराती आपल्याला गोड पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहन देतात -
साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छेचा मधुमेही व्यक्तीवर कसा परिणाम होतो?
ज्या लोकांमध्ये साखरेच्या पातळीमध्ये नेहमी चढ-उतार दिसून येतात, जसे की मधुमेह असलेल्या लोकांमध्ये साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. रक्तातील साखरेच्या तीव्र कमतरतेमुळे साखरयुक्त पदार्थांची तीव्र इच्छा होऊ शकते, ज्यामुळे साखरेच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते, जे शरीरात इन्सुलिन सोडते आणि पुन्हा कमी होते. असे चक्र कायम राहिल्याने वजन वाढू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण बिघडवू शकते. त्यामुळे साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमची इच्छा आणखी वाढेल आणि तुम्ही या चक्रात अडकू शकता. -
नवी दिल्ली येथील मॅक्स हेल्थकेअरच्या एंडोक्राइनोलॉजी आणि मधुमेह विभागाचे अध्यक्ष डॉ. अंबरीश मिथल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, गोड खाण्याच्या इच्छेपासून मुक्त होण्याचे १० मार्ग सुचवले आहे.
-
साखर किंवा गोड पदार्थ खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण कसे ठेवू शकतो?
१. साखर किंवा गोड पदार्थांचे सेवन कमीत कमी असले पाहिजे, परंतु दिवसातून पाच ते सहा चमचे (२५-३० ग्रॅम) पेक्षा जास्त सेवन करू नये. साखर किंवा गोड खाण्याची इच्छा नियंत्रित करणे हे बोलणे जितके सोपे वाटते, करणे तितकेच अवघड आहे. परंतु, अजूनही सुरुवात करण्यास उशीर झालेला नाही. -
२. पुरेशा प्रमाणात पाणी प्या : कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. जेव्हा तुम्हाला साखर किंवा गोड खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा एक ग्लास पाणी प्या.
-
३. वेळेवर खा आणि संतुलित आहार घ्या : फायबर युक्त आहार, पुरेशा प्रथिनयुक्त तत्वांसह योग्य वेळी खाल्ल्याने, तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले राहण्यास मदत होते. प्रक्रिया केलेल्या कर्बोदकांऐवजी बाजरी, धान्य, भाज्या आणि फळे यांसारख्या कर्बोदकांचे सेवन करा, जे साखरेचे प्रमाण कमी करतात. योग्य वेळी खाणे आणि दीर्घकाळ उपवास टाळणेदेखील गोड खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करू शकते.
-
४. लक्षपूर्वक खाणे :टीव्ही पाहात किंवा फोनवर गेम खेळत जेवण करू नये ज्यामुळे जेवणावरील तुमचे लक्ष विचलित होते. त्यामुळे जेवणाकडे लक्ष देऊन हळूहळू खा, जेणेकरून साखर किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होईल.
-
५. पुरेशी झोप आणि तणाव कमी करणे हे साखर किंवा गोड खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करू शकते.
-
६. साखरयुक्त पदार्थ घरी आणू नका. आपण गोड पदार्थ खाणे सोडण्यापासून सुरुवात करू शकता. जर तुम्हाला तीव्र इच्छा वाटत असेल तर ती फळे खाऊन ती इच्छा शांत करा. कृत्रिम गोड पदार्थ, साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करत नाहीत.
-
७. तुमचे पेय पिण्याचे पर्याय बदला. साखरयुक्त कोलास आणि पॅकेटमधील ज्यूस पिऊ नका, त्याऐवजी ताजे लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा साधे पाणी निवडा.
-
८. साखरयुक्त स्नॅकसाठी १५० कॅलरीजची मर्यादा ठरवा किंवा निरोगी पदार्थांसह एकत्र करून खाण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटेल.
-
तुम्हाला साखर किंवा गोड खाण्याची तीव्र इच्छा जाणवते तेव्हा फोन कॉल करणे किंवा फिरायला जाणे यासारख्या गोष्टी करून तुमचे मन दुसरीकडे वळवू शकता.
-
१०. काही लोकांना च्युइंगम खाऊन साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करण्याचा मार्ग चांगला वाटतो.
-
हे बदल एका रात्रीत होणार नाहीत. तुम्हाला याची सुरुवात करणे सोपे वाटू शकते, पण दीर्घकाळ या गोष्टी पाळणे अवघड वाटू शकते, त्यामुळे लहान गोष्टींपासून सुरुवात करा आणि हळूहळू त्यात नव्या गोष्टींची भर टाका. ( सर्व प्रातिनिधिक फोटो – सौजन्य – फ्रिपीक)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा