रात्री कामावरून थकून आराम करत झोपल्यावर सकाळी फ्रेश होणे आवश्यक आहे.
सकाळी उठल्यावर शरीरात स्फूर्ती येते आणि काम करण्याची शक्ती मिळते.
ही सकाळ शुभ आणि फ्रेश होईल ती या सवईंना मोडून.
जास्त झोप : विज्ञानानुसार माणसाची झोप सात ते नऊ तासांची असली पाहिजे. याहून अधिक झोप शरीरातील शक्ती कमी करून सुस्तीचे प्रमाण वाढवू शकते. यामुळे संपूर्ण दिवसाची कामं लांबली जातात आणि दिवसभर थकल्यासारखं वाटतं.
फोनचा वापर : सकाळी उठल्यावर फोन बघण्याचे फॅड आले आहे, यामुळे नकारात्मक विचार आणि चिंताजनक विचार मनाची प्रसन्नता भंग करू शकतात आणि यामुळे संपूर्ण दिवस त्याच विचारांमध्ये संपू शकतो.
पाणी न पिणे : सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ किंवा अनावश्यक गोष्टी बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर उत्स्फूर्त होते.
धूम्रपान : बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावर धूम्रपान करण्याची सवय असते, जे शरीरासाठी प्रचंड हानिकारक असते. यामुळे कर्करोग आणि हृदयविकारांची शक्यता झपाट्याने वाढते.
नाश्ता टाळणे : रात्रीच्या जेवणानंतर खाण्यामध्ये एक मोठं अंतर पडतं, त्यामुळे सकाळी उठल्यावर नाश्ता करणं अत्यंत आवश्यक असतं, यामुळे ॲसिडिटी होत नाही.
(सर्व फोटो सौजन्य ; पेक्सएल्स )
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)