-
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पत्नीचा कर्करोग घरगुती आहाराने बरा झाला आहे. दरम्यान, टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे की हळद, कडुलिंब आणि लिंबू कर्करोग बरा करू शकतात असे कोणतेही वैद्यकीय पुरावे नाहीत. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
सिद्धू म्हणतात त्याचा कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले. पण यापैकी काही उत्पादनांवर संशोधन चालू आहे. असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांना स्टेज-४ ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्याबद्दल त्यांनी अलीकडेच सांगितले की साखर, दुग्धजन्य पदार्थ टाळणे आणि हळद-कडुलिंबाचे सेवन केल्याने कर्करोग बरा होण्यास मदत होते. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
साधा आहार आणि साधारण जीवनशैलीने पत्नीचा कर्करोग बरा झाल्याचा दावा नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे. त्यांच्या पत्नीच्या जगण्याची शक्यता केवळ ५ टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांनी असं सांगितलं की, हळद, कडुलिंबाचे ज्यूस, अॅपल सायडर व्हिनेगर आणि लिंबू पाणी यांचे नियमित सेवन तर शुगर, कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद अशा गोष्टींचे नियमितपणे कटाक्षाने पालन केल्यामुळे पत्नीला अवघ्या ४० दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी.एस. प्रमेश यांनी २६२ वर्तमान आणि माजी कर्करोग तज्ञ (कॅन्सरतज्ज्ञ) यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये म्हटलंय की, “माजी क्रिकेटपटू त्यांच्या पत्नीच्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की दुग्धजन्य पदार्थ टाळल्याने व हळद-कडुलिंबाचे सेवन केल्याने असाध्य कर्करोग बरा होतो.” (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
याचा कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी या निवेदनात सांगितले आहे. पण यापैकी काही उत्पादनांवर संशोधन चालू आहे, असेही त्यांनी सांगितले. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
पुढे डॉ.सी.एस.प्रमेश म्हणाले की, अशा गोष्टी ऐकून कोणीही फसवू नये. असे दावे अशास्त्रीय आणि निराधार आहेत. ते म्हणाले की नवज्योत कौर यांच्यावर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी झाली ज्यामुळे त्यांचा कर्करोग बरा झाला. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर एक डाएट चार्ट देखील शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की या घरगुती उपायांनी त्यांच्या पत्नीचा कर्करोग बरा होण्यास मदत झाली आहे. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
रिकव्हरी वेगाने करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची पीएच पातळी ७ असली पाहिजे. या शिवाय वेलची, तुळस, पुदिना, आले आणि दालचिनी यांचा काढ्याचे सेवन करावे. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये किमान १२ ते १७ तासांचे अंतर असावे. सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करावे, तर उपवासानंतर दुसऱ्या दिवशीचे पहिले जेवण सकाळी १० वाजता करावे. (भारतातील एक प्राचीन पद्दत). (Photo: Pexels)
-
सकाळची सुरुवात कोमट पाणी, लिंबाचा रस आणि एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगरने करावी. याशिवाय पर्यायी दिवशी कच्च्या लसणाचे दोन तुकडे खावेत. यानंतर एक इंच कच्ची हळद/हळद पावडर आणि ९ ते १० कडुलिंबाची पाने खावेत. (तुम्ही त्याचा काढा देखील बनवू शकता) (Photo: Pexels)
-
तुती, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी किंवा डाळिंब, गाजर, बीटरूट आणि आवळ्याचा रस, एक चमचा बियांचे मिश्रण (भोपळ्याच्या बिया, पांढरे तीळ, सूर्यफूल बिया आणि अंबाडी/चिया बिया) यांसारख्या गोष्टी खाव्यात. (Photo: Pexels)
-
अक्रोडाचे ३ तुकडे, ब्राझील नट्सचे किंवा बदामांचे २ तुकड्यांचे (भिजवलेले) सेवन करावे. स्नॅकिंगसाठी, मखना (रॉक सॉल्टसह) आणि निरोगी चरबीसाठी, नारळाची मलई किंवा एवोकॅडो खावे. (Photo: Pexels)
-
नवज्योत सिद्धू यांनी शेअर केलेल्या डाएटची ही छायाचित्रे शेअर केली आहेत. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
-
यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारावेळी त्यांच्या पत्नीचा आहार कसा होता हे आपण पाहू शकतो. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
हेही पाहा- वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर होतोय परिणाम, हे ७ ज्यूस श्वासोच्छवासासंबंधी समस्या दूर करतील

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल