-
ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, आता हे दोन्ही ग्रह २०२५ मध्ये राशी परिवर्तन करणार आहेत, ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १८ मे २०२५ रोजी राहू मीन राशीतून कुंभ राशीत आणि केतू कन्यामधून सिंह राशीत प्रवेश करेल. या दोन्ही मायावी ग्रहांचे राशी परिवर्तन अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन अनेक लाभकारी परिणाम देईल. खूप मेहनत करावी लागेल, पण मेहनतीचे गोड फळ मिळेल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
राहू-केतूचे राशी परिवर्तन मकर राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. मेहनतीचे फळ मिळेल. दूरचे प्रवास घडतील. कुटुंबियांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या काळात मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा