-
हिवाळ्याच्या दिवसांत अनेक जण मक्याची भाकरी खाणे पसंत करतात. मक्याच्या भाकरीमध्ये उष्णता असते, जी हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, ही भाकरी चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी बनवायला तितकीच कठीण आहे. मक्याची भाकरी बनवताना ती अनेकदा मधूनच तुटते किंवा त्याचे पीठ हाताला चिकटू लागते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्हालाही अनेकदा अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल आणि यामुळे तुमची आवडती मक्याची भाकरी तुम्ही खाऊ शकत नसाल. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तर आज आम्ही तुम्हाला ही भाकरी बनविण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी सहजपणे मक्याची भाकरी बनवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परफेक्ट मक्याची भाकरी बनवण्यासाठी पीठ व्यवस्थित मळून घेणे खूप गरजेचे आहे. जेव्हा मक्याचे पीठ छान मळले जाते तेव्हा त्यापासून बनवलेल्या भाकरीही खूप मऊ आणि फुगीर होतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यासाठी एका पातेल्यात एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
पाणी थोडे गरम झाल्यावर त्यात एक चमचा तूप घाला. (फोटो सौजन्य: Freepik) -
तूप पाण्यात वितळल्यानंतर गॅस बंद करा.त्यानंतर गरम पाण्यात समान प्रमाणात म्हणजे एक कप मक्याचे पीठ घाला आणि चमच्याने लगेच हलवा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पाणी आणि पीठ थोडे घट्ट झाल्यावर १५ मिनिटे झाकून ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर हाताला तूप लावून पीठ थोडे कोमट असेल तेव्हाच हाताने मळून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मऊ पीठ तयार झाल्यावर पीठ स्वच्छ कापडाने झाकून, त्याचे छोटे गोळे बनवा. त्यानंतर एकेक गोळा घेऊन त्याची भाकरी थापून, ती भाजून घ्या. या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्हाला दिसेल की, मक्याची भाकरी न मोडता किंवा हाताला चिकटल्याशिवाय सहज बनते. (फोटो सौजन्य: Freepik)
अभिनेत्याने केली आत्महत्या, घरात गळफास घेऊन संपवलं जीवन