-
हिवाळ्यात आंघोळीसाठी लोक गरम पाण्यासाठी गिझर वापरतात. त्यामुळे थोड्याच वेळात पाणी गरम होते. पण गिझर वापरताना अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
गिझरच्या स्फोटच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोणत्या परिस्थितीत गिझर फुटू शकतो त्याची कारणे जाणून घेऊया: (फोटो: पेक्सेल्स)
-
गिझर जास्त वेळ चालू ठेवू नये. यामुळे ते अधिक गरम होते ज्यामुळे गिझर फुटू शकतो. (फोटो: पेक्सेल्स)
-
गिझर चालू ठेवल्याने त्याच्या बॉयलरवर दाब पडतो आणि त्यामुळे गळतीची समस्या उद्भवू शकते. तसेच, दाब वाढल्यामुळे गिझर फुटू शकतो. (फोटो: पेक्सेल्स)
-
याशिवाय बॉयलर लीक झाल्यास किंवा फुटल्यास विजेचा झटका लागू शकतो ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. (फोटो: पेक्सेल्स)
-
अनेक गिझर स्वयंचलित उष्णता सेन्सरने सुसज्ज असतात ज्यात लाल आणि हिरवे दिवे असतात. जर हा सेन्सर काम करायचा बंद झाला तरी गिझरचा स्फोट होऊ शकतो. या लाईटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (फोटो: फ्रीपिक)
-
गिझर कॉइल जास्त गरम केल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकतं, ज्यामुळे स्फोट देखील होऊ शकतो. (फोटो: फ्रीपिक)
ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल