थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम कांदाभजी आणि बटाटा वडा खाण्याची मजा काही वेगळीच.
परंतु, हे शरीराच्या पचनासाठी अवघड होते.
शरीरातील पचन सहज करायचे असेल तर हे योगासन दररोज सकाळी करणे अत्यंत आवश्यक आहे.
वज्रासन : वज्रासन पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय मागे ठेवून टाचांवर बसावे. या स्थितीत किमान ५ ते १० मिनिटे बसणे आवश्यक आहे. हे आसन खाल्ल्यानंतर करावे.
त्रिकोणासन : हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय पसरवत एक हात पायाच्या तळाशी ठेवत दुसरा हात वरच्या बाजूला ठेवावा. या आसनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मलासन : स्क्वॅटच्या स्थितीत बसून दोन्ही हात जोडून गुडघ्यांवर ठेवावे, यामुळे पचनतंत्र सक्रिय राहते.
भुजंगासन : या आसनासाठी आधी पोटावर झोपायचे आहे. त्यानंतर दोन्ही हात छातीकडे ठेऊन डोकं आणि छातीला हाताने वर खेचायचे आहे.
या स्थितीत काही वेळ स्थिर राहायचे आहे. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते व पोटासाठीदेखील ते फायदेशीर आहे.
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स, शटर स्टॉक)
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)