-
केस गळती हा प्रकार आज घरोघरी पसरलेला आजाराचं जणू लागला आहे. वाढते वय, आनुवंशिकता, ताण, नैराश्य अशा बऱ्याच गोष्टी केसगळतीसाठी कारणीभूत ठरतात.
-
केसांत असलेला कोंडा केसांच्या मुळाला कमकुवत बनवते ज्यामुळे केस गळतीला सुरुवात होते. याचा उपाय म्हणून वापरले जाणे विविध प्रकारचे केमिकलने भरपूर शॅम्पू केसांमध्ये असलेले गुणधर्म नष्ट करत केसांच्या मुळांची मजबूती कमी करते.
-
या सर्व समस्यांचा तोडगा म्हणजे नैसर्गिक औषध जे केसांची मजबुती मिळवण्यास व केसांमध्ये वाढ होण्यात मदत करतात.
-
कोरफड – कोरफडमध्ये असलेल्या जैविक उत्प्रेरकमुळे केसातील कोंडा कमी करण्यास तसेच केसांची निरोगी वाढ करण्यात मदत करते. ताजी कोरफड केसांची मुळाला लावल्यास केस मुलायम होतात.
-
खोबऱ्याचे तेल – खोबऱ्याचे तेल केसांना योग्य पोषण देते, प्रथिनेचे नुकसान होण्यापासून वाचविते, टाळूचे आरोग्य सुधारते, आणि केसांना मजबूत करण्यास मदत करते. तेल लावल्यानंतर मालिश केल्याने केस दाट होतात.
-
कांद्याचा रस – कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्यास केस पात्तळ ना राहता केसांची गुणवत्ता वाढते.
-
रोझमेरी तेल – सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुपाचे हे तेल केसांच्या मुळापर्यंत रक्तसंचारणात मदत करते आणि केसातील कोंडा कमी करत केसांचा दाटपणा सुधरवण्यात मदत करते.
-
रोझमेरी तेल – सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुपाचे हे तेल केसांच्या मुळापर्यंत रक्तसंचारणात मदत करते आणि केसातील कोंडा कमी करत केसांचा दाटपणा सुधरवण्यात मदत करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य