-
खूप भूक लागल्यावर काय खावं हे आपल्याला सुचतं नाही. अशावेळी आपण दुकानातून १० ते १५ रुपयांचे चिप्स, बिस्कीट विकत आणतो किंवा घरी काही खायला आहे का हे डब्यात किंवा फ्रिजमध्ये शोधू लागतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
असं करण्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे प्रोटिनयुक्त आहार घेणे. भुकेच्यावेळेस खाण्यासाठी तुम्ही लाडू बनवू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
पण, हा लाडू बेसन, रवा किंवा बुंदीचा नाही तर हरभाऱ्यांचा आहे. तर हरभरा, गुळापासून हिवाळ्यात पौष्टीक लाडू बनवण्यासाठी साहित्य, कृती काय लागेल जाणून घेऊया…(फोटो सौजन्य : @Freepik)
-
लाडू बनवण्यासाठी हरभरे पाव किलो, पाव किलो गूळ, एक वाटी सुखं खोबरं, एक वाटी काजू, बदाम, एक वाटी तूप, खसखस आणि तीळ इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
हरभरे भाजून घेऊन साल काढून घ्या.त्यानंतर जात्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.(फोटो सौजन्य : @Freepik)
-
पाव किलो गूळ किसून घ्या. एक वाटी सुखं खोबरं भाजून त्यात घाला.(फोटो सौजन्य : @Freepik)
-
एक वाटी काजू, बदाम भाजून घ्या आणि बारीक करून त्यात घाला.एक वाटी तूप गरम करुन त्यात घाला.(फोटो सौजन्य : @Freepik)
-
नंतर मिश्रण पुन्हा एकदा बारीक करून घ्या. त्यात खसखस आणि तीळ सुद्धा घाला. मग लाडू वळून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
अशाप्रकारे तुमचे स्पेशल लाडू तयार. (फोटो सौजन्य : लोकसत्ता डॉट कॉम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा