-
शरीराप्रमाणेच आपण आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेताना आपण सुद्धा जरा गोंधळून जातो. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात खूप गोष्टी उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
या गोष्टी बघूनच आपण गोंधळून जातो. आपल्याला प्रश्न पडतो नेमकं आपण काय वापरलं पाहिजे. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तांदळाच्या पिठात विविध गुणधर्म असतात जे मृत पेशी काढून आपली त्वचा चमकदार बनविण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यामुळे तांदळाचा स्क्रब लावून तुम्ही तुमची त्वचा नेहमीपेक्षा अधिक निरोगी आणि चमकदार बनवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तांदळाचा स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य : १ वाटी तांदूळ, १ वाटी कच्चे दूध, २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल इत्यादी. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
एक वाटी स्वच्छ तांदूळ घ्या आणि किमान चार तास भिजत ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
आता भिजवलेले तांदूळ बारीक करून त्यात दूध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकून पेस्ट बनवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कमीतकमी १० मिनिटे स्क्रब करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
टिप : तुमची त्वचा निरोगी आणि एक्सफोलिएट दिसण्यासाठी आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा हा स्क्रब वापरा. (फोटो सौजन्य : @Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”