-
हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे थंडीत निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी योग्य अशी स्किनकेअर निवडणे खूप गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तेव्हा तुम्ही थंडीत चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी स्किनकेअरमध्ये अंड्याचा समावेश करू शकता. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या दैनंदिन स्किनकेअर रूटीनमध्ये अंड्याचा समावेश का करावा याची कारणे खालीलप्रमाणे… (फोटो सौजन्य : @Freepik)
-
१. मुरमे आणि ब्लॅकहेड्स काढणे – सेबम म्हणजे एक प्रकारचे तेल आहे. हे तेल त्वचेला मऊ, मुलायम व आर्द्र ठेवण्यास मदत करते. सेबमचे प्रमाण वय, लिंग, त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. तर, अंड्याचा पांढरा भाग सेबम रेग्युलेशन ॲबिलिटीजकरिता, स्राव नियंत्रित करण्यासाठी आणि घाम, प्रदूषणामुळे निर्माण होणारे अतिरिक्त सेबम शोषून घेण्याच्या क्षमतेसाठी आवश्यक मानला जातो. अंड्यामधील एपिडर्मिस तुम्हाला (epidermis) पुरळ आणि जळजळ होण्यापासून वाचवतो. त्याव्यतिरिक्त त्वचेची लवचिकता वाढवणे सुलभ होऊ शकते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
२. त्वचेचे हायड्रेशन – अंड्यामध्ये बी १२ जीवनसत्तव असते, जे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कायम ठेवते आणि हायड्रेशनसाठी मदत करते. हे पोषक तत्त्व शरीराच्या उतींची दुरुस्तीही करते. सूर्याची अतिनील किरणे आणि प्रदूषण यांमुळे ओढवणाऱ्या पुढील समस्यांपासूनही त्वचेचे संरक्षण करते. अंड्यामुळे आतडे निरोगी राहून, त्वचादेखील स्वच्छ राखली जाते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
३. चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करते – अंड्यामध्ये अल्ब्युमिन असते. अल्ब्युमिन हे एक असे पोषक तत्त्व आहे, जे त्वचेला ड्राय करते. त्वचेच्या छिद्रांमधील कचरासुद्धा बाहेर काढून टाकण्यास मदत करते. परिणामी ही छिद्रे कालांतराने आकुंचन पावतात आणि त्वचा स्वच्छ होते. त्याशिवाय ते त्वचेतून सेबम (sebum) देखील बाहेर काढून छिद्रे साफ करते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
४. त्वचेचा रंग – अंड्यामध्ये ड जीवनसत्त्व असते, जे त्वचेचा रंग उजळण्यासाठी ओळखले जाते. अंड्यामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन हे घटकदेखील असतात. जे त्वचा आणि डोळ्यांचे किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे दोन महत्त्वाचे पोषक घटक त्वचेचे आरोग्य वाढवतात आणि संपूर्ण हिवाळ्यात तुमचा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
साइड इफेक्ट्स – त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी अंडे हा उत्तम पर्याय असला तरीही काही गोष्टींची काळजी घेणे मात्र खूप आवश्यक आहे. अंड्यातील काही घटक तुमच्या त्वचेसाठी खूप तीव्र किंवा अयोग्य ठरू शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यामुळे तुम्हाला अंड्याची ॲलर्जी होत नाही ना याची खात्री करून घ्या. त्याव्यतिरिक्त अंड्याचा पांढरा भाग त्वचेच्या पृष्ठभागाच्या थरावर रासायनिक असंतुलन निर्माण करू शकतो आणि त्यामुळे चिडचिड होऊ शकते. तुम्हाला अशा समस्या जाणवल्या, तर कृपया तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांना नक्की भेट द्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याव्यतिरिक्त जर तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल, तर तुमच्या स्वयंपाकघरात जा आणि निरोगी, चमकदार त्वचेसाठी या सोप्या व परवडणाऱ्या स्किनकेअर रहस्यांचा नक्की वापर करा… (फोटो सौजन्य : @Freepik)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख