-
बटर किंवा लोणी हा एक नैसर्गिक दुग्धजन्य पदार्थ आहे. दुधामध्ये आढळणाऱ्या फॅट्स (चरबी) आणि प्रोटीन (प्रथिने) पासून बटर बनवले जाते. बटर बनवण्यासाठी ताज्या किंवा फर्मेंटेड क्रीमला चर्निंग केल्यावर त्यातील स्निग्ध पदार्थ एकत्र होतात आणि बटर दुधापासून वेगळे होते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, बनावट किंवा भेसळयुक्त बटरही बाजारात उपलब्ध आहे? पण काळजी करू नका. कारण- आम्ही याबद्दल तज्ज्ञांकडून माहिती घेतली आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
अस्टर आरव्ही (Aster RV) हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल पोषणतज्ज्ञ सौमिता बिस्वास म्हणाल्या की, मार्जरीन आणि इतर वनस्पती तेलावर आधारित स्प्रेड हे कृत्रिमरीत्या बटरला पर्याय म्हणून तयार केले जाते. हे स्प्रेड भाजीपाला तेलांवर प्रक्रिया करून बनवले जाते. बऱ्याचदा घन किंवा पसरण्यायोग्य सुसंगतता निर्माण करण्यासाठी त्यावर हायड्रोजनेशनची प्रक्रिया करतात. या प्रक्रियेमुळे ट्रान्स फॅट्स तयार होऊ शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
सौमिता बिस्वास यांच्या मते, मार्जरीन आणि इतर वनस्पती तेलापेक्षा खरे बटर आरोग्यदायी का आहे याची कारणे पुढीलप्रमाणे… १. पोषक घटक : बटरमध्ये फायदेशीर जीवनसत्त्वे, खनिजे असतात. जसे की जीवनसत्त्वे ए, डी, ई व के, तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम यांसारखी खनिजे. एकूणच हे पोषक घटक मार्जरीन आणि इतर वनस्पती तेलाच्या स्प्रेडमध्ये कमी प्रमाणात असतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
२. हेल्दी फॅट प्रोफाईल : बटर प्रामुख्याने सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थांनी बनलेले असते; ज्याला काही वर्षांपूर्वी आरोग्यासाठी घातक ठरवण्यात आले होते. पण, नवीन संशोधन सुचवते की, संपूर्ण प्रक्रिया न केलेले बटर सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थांचे मध्यम प्रमाणात सेवन करणे इतके हानिकारक नाही आणि त्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील असू शकतात, असे बिस्वास यांनी नमूद केले. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
३. ट्रान्स फॅट्सची अनुपस्थिती : मार्जरीन आणि इतर वनस्पती तेलाच्या स्प्रेडमध्ये हायड्रोजनेशन प्रक्रियेमुळे औद्योगिकरीत्या उत्पादित ट्रान्स फॅट्स असू शकतात. ही बाब हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते. पण, खऱ्या बटरमध्ये कोणतेही ट्रान्स फॅट्स नसतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
४. अधिक नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेलं बटर : बटर हा कमीत कमी प्रक्रिया केलेला, नैसर्गिक दुग्धजन्य पदार्थ आहे. तर, मार्जरीन आणि इतर वनस्पती तेलाच्या स्प्रेड तयार करण्यासाठी औद्योगिक प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया मूळ वनस्पती तेलांमध्ये आढळणारे नैसर्गिक पोषक आणि संयुगे काढून टाकू शकते किंवा बदलू शकते, असे बिस्वास म्हणाले आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तसेच हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वास्तविक बटर हे मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेल्या पर्यायांपेक्षा सामान्यत: आरोग्यदायी असते. तरीही एकंदर संतुलित आहाराचा भाग म्हणून ते कमी प्रमाणातच सेवन केले पाहिजे. आरोग्यदायी पद्धत म्हणजे उच्च दर्जाचे, प्रक्रिया न केलेले स्निग्ध पदार्थ विविध स्रोतांमधून निवडणे; ज्यामध्ये लोणी, ऑलिव्ह ऑइल, मेवे व ॲव्होकॅडो यांचा समावेश आहे, असे बिस्वास म्हणाले. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
बटर बनावट आहे का हे तपासण्यासाठी टिप्स… १. बटरची शुद्धता तपासण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे पाम टेस्ट. बटरचा एक लहान भाग तळहातावर ठेवा. खोली आणि शरीराच्या तापमानामुळे बटर वितळले, तर ते शुद्ध आहे समजा. २. लोणी गरम केल्यावर जर ते लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंगाचे झाले, तर ते शुद्ध आहे; पण जर त्याचा रंग हलका पिवळा झाला तर तो नक्कीच भेसळ आहे, असे बिस्वास म्हणाले. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
३. डबल-बॉयलर पद्धतीचा वापर करून तुम्ही बटर बनावट नाही ना हे तपासू शकता. एका काचेच्या भांड्यात काही बटर क्युब्स आणि खोबरेल तेल वितळून घ्यावे. नंतर जार रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे. त्यानंतर थंड झाल्यावर बटरचे निरीक्षण करा. जर लोणी आणि तेलाचे वेगवेगळे थर तुम्हाला दिसत असतील, तर ते बटर नसल्याचे संकेत आहेत. ४. दुसऱ्या पद्धतींमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl) आणि साखरेचे मिश्रण घालणे किंवा आयोडीन घालणे यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त किराणा खरेदी करताना ऑथेंटिक स्रोतांकडून साहित्य घेणे केव्हाही चांगले. एखादा पदार्थ खरेदी करण्यापूर्वी नेहमी लेबले वाचा आणि आहारातील रचना तपासा, असे बिस्वास म्हणाले आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा