-
लहान मुले असो वा मोठी माणसं सँडविच खायला सर्वांनाच आवडतात. पण, शेफ वेल्टन साल्दान्हा यांनी नवीन टिपद्वारे सँडविच बनविण्याच्या कलेला अनपेक्षित वळण दिले आहे. त्यांचे हे अनपेक्षित वळण म्हणजे ‘थ्री फिंगर रूल’ होय. इन्स्टाग्रामवर शेफ साल्दान्हा यांनी एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, सँडविचची उंची तीन बोटांच्या रुंदीपेक्षा जास्त नसावी. त्यामुळे खाताना तोंड उघडण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणार नाही आणि सँडविच हातातून पडणार नाही. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, सल्लागार, आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षक, कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, सँडविचच्या उंचीसाठी तीन बोटांचा नियम ही एक संकल्पना असली तरी त्याला समर्थन देण्यासाठी कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. पण, आम्ही या विधानाचे अर्गोनॉमिक आणि पौष्टिक दृष्टिकोनातून परीक्षण करू पहिले. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
अर्गोनॉमिक पैलू असे सांगतो की, जबड्याला आराम द्यावा. म्हणजेच सँडविच तयार करताना तोंडाचे आरामदायित्व लक्षात घ्यावे. सँडविच योग्य प्रमाणात तोंडात जाईल आणि ते आरामशीरपणे खाता येईल व तोंडाचा ताण कमी होईल. तसेच सँडविच लहान बनवले, तर ते तोंडात पूर्णपणे जाते आणि योग्यरीत्या चघळण्यास आणि पचनास प्रोत्साहन देईल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर पौष्टिक पैलू असे सांगतो की, सँडविचच्या उंचीचा त्याच्या पौष्टिक मूल्यावर थेट परिणाम होत नसला तरी त्याचा अन्नसेवनावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खूप उंच असलेल्या सँडविचचे मोठे घास घ्यावे लागतात आणि त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढवते. तसेच तीन बोटांचा नियम प्रत्येक पोषक घटकाचा समतोल राखण्याची खात्री करून घेऊ शकतो आणि शरीराला कर्बोदके, प्रथिने व चरबी यांचे चांगले मिश्रण सुनिश्चित करून, शरीराला योग्य पोषण मिळू शकते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तीन बोटांचा नियम प्रॅक्टिकल आहे का ? कनिक्का मल्होत्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, स्वयंपाकाच्या दृष्टिकोनातून, तीन बोटांचा नियम सँडविचसाठी एक प्रॅक्टिकल दृष्टिकोन आहे. खूप जास्त थर किंवा फिलिंग्स सँडविचला उभे ठेवण्यास कठीण बनवू शकतात आणि त्यामुळे ते तुटण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे सँडविचची उंची नियंत्रित करून, तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवींचा समतोल साधू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
थ्री फिंगर रूल म्हणजेच तीन बोटांचा नियम हा सँडविच बनवण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. तुमचे सँडविच ताजे, चवदार ठेवण्याचे आणखीन काही मार्ग मल्होत्रा यांनी सांगितले आहेत ते पाहूया… (फोटो सौजन्य : @Freepik)
-
१. ब्रेडची निवड – एक हेल्दी, होल ग्रेन ब्रेड सँडविचसाठी उत्तम आहे. होल ग्रेन ब्रेडमध्ये फायबर असते, जे पचनास मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. ब्रेड टोस्ट केल्याने कुरकुरीतपणा येऊ शकतो आणि सँडविच ओले होणे टाळता येईल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
२. लेअर – ब्रेडच्या तुकड्यांवर हम्मसचा पातळ थर लावा. हम्मस हा चणे, तिळाचे तेल, लिंबाचा रस आणि मिरी यांचा वापर करून बनवलेला एक चविष्ट पदार्थ आहे. त्यामुळे ब्रेडवर ओलसरपणा जाणवणार नाही.
तळापासून लेअर बनवायला सुरुवात करा : ग्रील्ड चिकन, टर्की किंवा टोफू असे तयार केलेले पदार्थांचे लेअर करा. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व फायबरसाठी विविध रंगीबेरंगी भाज्यासुद्धा त्यात घाला.
ओलावा नियंत्रित करा : सँडविचमध्ये ओलेपणा टाळण्यासाठी टोमॅटो आणि काकडीला शेवटच्या लेअरला ठेवा.
हेल्दी फॅट्स : हृदयाच्या आरोग्यदायी चरबीसाठी ॲव्होकॅडो, नट्स किंवा बिया निवडा. (फोटो सौजन्य : @Freepik) -
३. कटिंग आणि सर्व्हिंग – डायगोनल कट : हे सँडविचच्या आतील पदार्थ बाहेर पडण्यापासून रोखू शकतात. सँडविचला लहान भागांमध्ये कापून, कॅलरीजचे सेवन व्यवस्थापित करण्यात साह्यभूत करू शकता.
अर्ध्या भागात कट करा : मोठं सँडविच बनवलं असेल, तर त्याला मधोमध कापून घ्या.
साइड सॅलड : साइड सॅलड तुमच्या जेवणात चिप्स आणि फ्राईजऐवजी अतिरिक्त पोषक आणि फायबर देऊ शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख