-
हिवाळ्यामध्ये अनेकांना सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवतात. त्यामुळे काही जण ऑफिसला जाताना गरम पाण्याने भरलेले थर्मास किंवा फ्लास्क घेऊन जातात.(फोटो सौजन्य: Freepik)
-
थर्मास किंवा फ्लास्कमधील पाणी तासन् तास गरम राहते. त्यामुळे घराबाहेर असतानाही लोकांना गरम पाणी पिता येते. परंतु, सतत थर्मास वापरल्याने हळूहळू त्यातून कुबट वास येऊ लागतो.(फोटो सौजन्य: Freepik)
-
ही दुर्गंधी दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
थर्मास किंवा फ्लास्क बराच वेळ वापरल्यामुळे त्या बाटलीच्या आतून दुर्गंधी येऊ लागते. नीट साफसफाई न केल्यामुळे ही दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत थर्मासची साफसफाई करणे खूप कठीण होते.(फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, थर्मास किंवा फ्लास्कमधून येणारा वासदेखील सहजपणे दूर केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
थर्मास स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम ते पाण्यात भिजवा. त्यानंतर त्यामध्ये डिटर्जंट घाला आणि ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. ते व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी त्यात कापसाचा तुकडा किंवा टॉवेल टाकून स्वच्छ करा.(फोटो सौजन्य: Freepik)
-
तसेच वर्तमानपत्राच्या मदतीनेही तुम्ही फ्लास्क स्वच्छ करून, त्यामधून येणारी दुर्गंधी सहजपणे दूर करू शकता. त्यासाठी संपूर्ण थर्मास किंवा फ्लास्क गरम पाणी व डिटर्जंटने नीट धुवा आणि मग तो कोरडा करा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आता स्वच्छ आणि कोरड्या वर्तमानपत्राचे छोटे तुकडे करून ते तुकडे आतमध्ये ठेवा आणि झाकण काही वेळ बंद ठेवा. आता फ्लास्कमधून वर्तमानपत्र काढा आणि कोमट पाण्याने ते स्वच्छ करा (फोटो सौजन्य: Freepik)
-
या प्रकरणात फ्लास्कमधून येणारा दुर्गंध निघून जाईल. त्याव्यतिरिक्त तुम्ही थर्मास स्वच्छ करण्यासाठी मिठाचादेखील वापर करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख