-
सकाळी लवकर ऑफिसला जाणाऱ्या अनेक महिला रात्रीच पोळी बनविण्यासाठी लागणारे गव्हाचे पीठ मळून ठेवतात. गव्हाचे पीठ रेफ्रिजरेटरमध्ये साठवणे ही बऱ्याच घरांमध्ये सामान्य गोष्ट आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मळून ठेवलेले गव्हाचे पीठ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यामध्ये घातक जीवाणू निर्माण होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मात्र, या व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे खरंच गव्हाच्या पिठाची कणीक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे योग्य आहे का? याबाबत खरी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही काही आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
धर्मशिला नारायण हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ पायल शर्मा, यांनी इंडियनएक्स्प्रेस.डॉट कॉमला सांगितले की, ताजेपणा राखून, पीठ खराब होण्यापासून रोखण्यासाठी कणीक योग्यरीत्या ठेवली जाणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
खरे तर, मळलेली कणीक हवाबंद डब्यात साठवली पाहिजे. कारण- त्यामुळे कणीक कोरडी होण्याला किंवा रेफ्रिजरेटरमधील इतर गंध शोषण्याला प्रतिबंध होतो,” असे त्या म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“गव्हाची कणीक जास्त वेळ बाहेर ठेवल्यास ती उबदार वातावरणात आंबते. रेफ्रिजरेटिंग ही प्रक्रिया मंद करू शकते; परंतु तरीही ही कणीक २४-४८ तासांच्या आत वापरली जावी. या कालमर्यादेच्या पलीकडे पिठाला आंबट चव येऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तसेच त्यातील पोषक घटकही कमी होऊ शकतात,” असे शर्मा म्हणाल्या. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, ठरावीक तासांनंतर फ्रिजमध्ये कणीक ठेवल्यास, त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“तुम्ही जर कणीक जास्त कालावधीसाठी साठवण्याचा विचार करत असाल, तर पीठ गोठवणे हा एक चांगला पर्याय आहे. ते फ्रिजरमध्ये अनेक आठवडे टिकू शकते आणि आवश्यकतेनुसार तुम्ही ते वितळवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यामुळे पीठ रेफ्रिजरेट करणे अल्पावधीसाठी चांगले आहे; परंतु आरोग्य बिघडू नये आणि चांगली चव मिळावी यासाठी मळलेल्या कणकेचे लवकर सेवन करणे आवश्यक आहे,” असे शर्मा म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”