-
शेविंग म्हटलं की आज महिलांसाठी बरेच उपाय उपलब्ध आहेत.
-
रेझरमुळे शेविंग करणे अधिकच सोपे झाले आहे, परंतु याचा चुकीच्या पद्धतीने उपयोग केल्यास याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात.
-
वॅक्सिंग हा प्रकार सर्व महिलांचे प्राधान्य नसते, त्यामुळे रेझरचा अचूक पद्धतीने वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास शरीरावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
-
शेव करण्याअगोदर केसांना लावणारा कंडिशनर लावणे फायद्याचे ठरेल. याचे कारण असे की, कंडिशनर मुळातच मुलायम असल्यामुळे रेझर अलगद फिरून शरीरावरचे केस सहजरित्या काढू शकेल आणि त्वचा सुरक्षित आणि मुलायम राहील.
-
शेविंग करताना कुठच्याही प्रकारची घाई त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे शेविंग करण्यासाठी खास वेळ काढून ही प्रक्रिया विलंबित गतीने पार पाडावी.
-
शेविंग केल्यानंतर शरीरावर काही फोडी आल्या असल्यास दूध आणि पाणी एकत्र करून शरीरावर लावणे फायद्याचे ठरेल.
-
शेविंग करताना केव्हाही सुरुवात ही खालच्या बाजूने वर येणे फायद्याचे ठरेल. ज्या दिशेने केसांची वाढ होत आहे, त्या दिशेच्या विरुद्ध रेझर फिरवल्याने केस पुन्हा वाढण्यास दीर्घ काळ लागतो आणि हे शरीरासाठी फायद्याचे आहे.
-
शेविंग करण्याआधी शरीराचा तो विशिष्ट भाग स्वच्छ धुवून काढणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे कुठलेही इन्फेक्शन होण्याची शक्यता टळेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ