-
चहा किंवा कॉफीसारखी गरम पेय ‘डिस्पोजेबल पेपर कप’मध्ये पिणे आता सर्वसामान्य झाले आहे.
-
याबाबत म्हटले जाते की, असे केल्याने मायक्रोप्लास्टिक कण पोटात जाऊ शकतात, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत.
-
अलीकडेच, महाराष्ट्रातील बुलढाणा शहरात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पेपर कपवर बंदी घालण्याचे निर्देश दिले.
-
एका निवेदनात त्यांनी दावा केला की, पेपर कप हे कर्करोगाच्या वाढत्या घटनांमागील मुख्य कारण आहे.
-
वोक्हार्ट हॉस्पिटलचे ऑन्कोसर्जन डॉ. तीर्थराज कौशिक यांनी सांगितले की, कपचा कर्करोगाशी थेट संबंध नसला, तरी कप तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली मायक्रोप्लास्टिक्स किंवा परफ्लुरोआल्काइल पदार्थ या रसायनांमुळे कर्करोग होऊ शकतो.
-
याबाबत अन्नामध्ये मायक्रोप्लास्टिक्स टाळण्यासाठी काही सावधगिरीचे उपाय सांगितले आहेत.
-
ज्यामध्ये काचेची किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी वापरणे.
-
प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करणे टाळा. मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित कंटेनर निवडा.
-
एकदा वापरून टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करा, असे सुचवले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels) हेही पाहा : ‘या’ कारणांमुळे हिवाळ्यात होते सर्दी? अशी घ्या आरोग्याची काळजी

पुढल्या महिन्यापासून पैसाच पैसा! शनिदेवाच्या राशीत राहूचे गोचर होताच ‘या’ ५ राशी होणार गडगंज श्रीमंत? तुम्ही आहात का भाग्यवान?