-
असं म्हटलं जातं की, तुम्ही सकाळी जी गोष्ट पहिल्यांदा खाता, त्याचा तुमच्या शरीरावर खूप प्रभाव पडतो. खरंतर तुम्ही सकाळी जे काही खाता किंवा पिता ते तुमच्या चयापचयाला गती देते आणि त्यानंतर शरीराला ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणाऱ्या गोष्टींचे सेवन करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला सकाळी रिकाम्यापोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, जे तुमचे आरोग्य उत्तम ठेवू शकतात त्याबाबत सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Freepik)
-
सकाळी सर्वप्रथम तुम्ही गुळाचा एक तुकडा आणि कोमट पाणी पिऊ शकता. असे केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा, लोह मिळेल आणि तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होणार नाही. (फोटो सौजन्य: Freepik)
-
याशिवाय दररोज सकाळी याचे पालन केल्याने तुमचे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. यामुळे पोट साफ होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गूळ कोमट पाण्याव्यतिरिक्त तुम्ही कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून पिऊ शकता, यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहण्यास मदत होते, यामुळे शरीर स्वच्छ होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य: Freepik)
-
याशिवाय सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांपासून तुमचे संरक्षण करण्यातही हे उपयुक्त आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर या दोन गोष्टींचे पालन करावे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
याशिवाय हिवाळ्याच्या दिवसात सकाळी तुम्ही दालचिनीचा चहादेखील घेऊ शकता, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सकाळी सर्वात आधी साखर किंवा आंबट पदार्थ खाऊ नका, यामुळे गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात सकाळची सुरुवात शरीराला उबदार ठेवणाऱ्या गोष्टींनी करावी. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”