-
अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे आपल्या शरीरावर बराच वाईट परिणाम होताना दिसतो.
-
या बऱ्याच समस्यांपैकी एक समस्या म्हणजे अनेक गोष्टींचा विसर पडणे.
-
आज एखादं काम सांगितलं आणि आपण ते नाही करू शकलो, तर अगदी सहजपणे आपण विसरल्याचं कारण देतो.
-
यामागचे गांभीर्य वेळीच लक्षात घेतले नाही, तर पुढे जाऊन अगदी अल्झायमर होण्यापर्यंत हा त्रास आपल्यासमोर दत्त म्हणून उभा राहू शकतो.
-
या त्रासापासून वाचायचे असेल, तर विशिष्ट अशा पाच पदार्थांचा नियमित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरेल.
-
अंडी- अंड्यामध्ये असलेले पोषक घटक मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये बी १२ आणि बी ६ ही जीवनसत्त्वे असतात; जी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. हे पोषक घटक मेंदूची कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करतात आणि मानसिक ताजेतवानेपणाला चालना देतात.
-
अक्रोड- इ जीवनसत्त्वासारख्या पोषक घटकांनी भरपूर असलेल्या अक्रोडाचे सेवन करणे उपयुक्त आहे. अक्रोडामुळे तणाव कमी होतो आणि मेंदूला व्यवस्थितपणे चालना मिळत राहते.
-
डार्क चॉकलेट- फ्लेवोनोइड्स, कॅफिन व अँटीऑक्सिडंट्स हे घटक डार्क चॉकलेटमध्ये असतात. फ्लेवोनोइड्समुळे मेंदूला उत्तम रीतीने रक्तप्रवाह होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे सोपे होते आणि स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे मानसिक तीव्रता आणि कार्यक्षमतादेखील वाढते.
-
ब्रोकोली- के जीवनसत्त्व ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मेंदूची शक्ती वाढवण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
-
संत्र- क जीवनसत्त्व या पोषक घटकाने भरपूर असलेले संत्रे हे फळ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्या सेवनाने केवळ स्मरणशक्तीच सुधारत नाही, तर संपूर्ण मेंदूचे आरोग्यही सुधारते.
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)