-
आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे दररोज सेवन केल्याने केस आणि त्वचेचे अनेक फायदे होतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आवळ्याचा रस असो किंवा आवळ्याचा मोरावळा असो; आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन केले जाते. हिवाळ्याच्या दिवसात आवळा खाणे अधिक गुणकारी मानले जाते.(फोटो सौजन्य: Freepik)
-
अनेक जण आवळ्याचे सेवण सकाळी करतात; परंतु तुम्ही आवळा रात्रीसुद्धा खाऊ शकता, हे तुम्हाला ठाऊक आहे का? (फोटो सौजन्य: Freepik)
-
आवळा रात्रीदेखील सेवन करू शकता. मात्र, रात्री कच्चा आवळा खाल्ल्यास सर्दी होऊ शकते. आपण रात्री आवळ्याचे पाणी पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आवळा पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि विषारी घटक शरीरातून सहज निघून जातात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आवळ्याचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते आणि केस मजबूत होतात. तुमचे केस गळत असतील किंवा पांढरे होत असतील, तर तुम्ही आवळा पाणी पिऊ शकता. हे केसांना मुळांपासून मजबूत आणि पोषण देते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आवळा पाणी वजन कमी करण्यासाठीदेखील खूप चांगले आहे. हे चयापचय गतिमान करते आणि चरबी बर्न करते. त्यात खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन खूप वेगाने कमी होते. त्यामुळे झोपही सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आवळा पाणी बनविण्यासाठी १-२ आवळे कापून, ते तुकडे एका ग्लास पाण्यात भिजवा. आता दोन ते तीन तास ते तसेच राहू द्या. काही वेळाने ते गाळून प्या. तुम्ही ते रात्री पाण्यात टाकून सकाळी पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”