-
हिवाळ्यात हवेतील धुके आणि धुरामुळे फुप्फुसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
-
भारतातील मेट्रोपॉलिटन शहरे हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात कमालीची उच्च पातळी गाठण्याची शक्यता असल्याने, ते तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि तणावाच्या पातळीवर परिणाम करू शकतात.
-
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शौनक अजिंक्य यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि चिंता, नैराश्य येऊ शकते.
-
वायुप्रदूषणामुळे शरीरात जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
-
न्यूरोइंफ्लेमेशन -मेंदूच्या जळजळीचा एक प्रकार- सेरोटोनिन आणि इतर मूड-रेग्युलेटिंग न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीत व्यत्यय आणते.
-
दीर्घकालीन प्रदूषणामुळे न्यूरोडिजेनेरेटिव्ह विकारांचा धोका वाढतो, नैराश्य वाढते, असे अभ्यासात आढळले आहे.
-
यामुळे वृद्धांसह तरुणांनाही धोका वाढला आहे.
-
वोक्हार्ट रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सुलेमान लधानी म्हणाले की, प्रदूषणाच्या वाढत्या पातळीबद्दल सतत चिंतेमुळे तणाव आणि चिंता वाढू शकते.
-
प्रदीर्घ काळ प्रदूषित वातावरणाच्या संपर्कामुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर लवकर होण्याचा धोकादेखील वाढू शकतो.
-
खराब हवेमुळे झोपेत व्यत्यय येतो, तीव्र थकवा आणि चिडचिडेपणा निर्माण होतो.
-
प्रदूषणाची पातळी उच्च असताना घराबाहेर पडणे टाळणे आणि घरामध्ये नियमित शारीरिक हालचाली करणे योग्य असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels) हेही पाहा : पेपर कपमध्ये चहा व कॉफीचे सेवन केल्यामुळे होऊ शकतो कर्करोग? तज्ज्ञ सांगतात…
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”