-
भारतीय आहारात तुपाला (Ghee) अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि त्याचे फायदेही आहेत.
-
तुपाच्या सेवनामुळे आतड्याला वंगण केले जाते.
-
शास्त्रोक्त सेवनामुळे तुपाचे फायदे अनेक पटीने वाढतात.
-
मुंबईच्या जिनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी याबाबत सांगितले की, सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाण्यात तूप प्यायल्याने गॅस, अपचन, आतड्याला सूज येणे किंवा बद्धकोष्ठता या पोटाशी संबंधित समस्या बऱ्या होण्यास मदत होते.
-
वजन कमी करण्यासाठी तर तुपाचे पाणी खूप लोकप्रिय आहे.
-
त्वचेचे कोलेजन वाढवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती, ऊर्जा वाढवण्यासाठीही तूप महत्त्वाचे आहे.
-
परंतु, तूप फायदेशीर असले तरी ते माफक प्रमाणात घ्यावे, असेही पटेल म्हणाल्या.
-
आहारतज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा यांनी सांगितले की, रिकाम्यापोटी कोमट पाण्यासोबत तूप सेवन करणे ही एक लोकप्रिय आयुर्वेदिक पद्धत आहे.
-
तुपातील ब्युटीरिक अॅसिड आणि संतृप्त चरबीमुळे पचन सुधारते.
-
आतड्याचे आरोग्य वाढते आणि नियमित आतड्यांसंबंधी हालचालींना फायद्याचे आहे.
-
तुपामध्ये संतृप्त चरबी असते, त्यामुळे विशेषत: उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी त्रास असलेल्या व्यक्तींनी वैद्याकीय सल्ल्यानंतरच त्याचे सेवन केले पाहिजे, असेही डॉ. बिराली म्हणाले.
-
तुपाचे पौराणिक फायदे असले, तरी पाण्यासोबत तूप पिण्याचे वैद्याकीय पुरावे मिळत नाहीत.
-
त्यामुळे असे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels & Freepik) हेही पाहा : वायुप्रदूषणामुळे फुप्फुसांचे आरोग्य धोक्यात आहे का? मानसोपचारतज्ज्ञ यांनी सांगितल्या ‘या’ गोष्टी

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी