-
हिवाळ्याच्या दिवसात शरीराची अधिक काळजी घेतली जाते. या ऋतूमध्ये बहुतेक लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा परिस्थितीत आवळ्याचा काढा पिणे खूप उपयुक्त आहे. हे रोज प्यायल्याने अनेक फायदे होतात. आवळ्याचा काढा प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि पचनही सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यासाठी ४-५ ताजे आवळे, २ कप पाणी, ५-६ तुळशीची पाने, आलं आणि मध घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आवळ्याचा काढा तयार करण्यासाठी सर्वप्रथम आवळ्याचे लहान तुकडे करा आणि ते एका पातेल्यात दोन ते तीन कप पाणी घेऊन गरम करा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आता त्यात आवळा, आलं आणि तुळशीची पाने टाका. १५ मिनिटे व्यवस्थित शिजवा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मिश्रण निम्मे झाल्यावर गाळून घ्या आणि त्याची चव वाढवण्यासाठी त्यात मध टाका. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही आवळ्याचा काढा कधीही पिऊ शकता. मात्र, तो सकाळी रिकाम्या पोटी पिणे खूप फायदेशीर आहे. तसेच तुम्ही तो दिवसातून दोनदा पिऊ शकता. परंतु, तो नेहमी ताजा बनवून प्यावा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
केस घनदाट करण्यासाठी आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी आवळ्याचा काढा. केस आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवळ्याचा काढा जास्त चांगला आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यात व्हिटॅमिन-सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे केसांचे पोषण करतात आणि मुळे मजबूत करतात. तसेच हे चयापचय गतिमान करते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. आवळ्याच्या उकडीने पचनक्रिया सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”