-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. नुकताच सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला असून तो संपूर्ण एक महिना या राशीत राहिल. तसेच दुसरीकडे मंगळ ग्रह कर्क राशीत विराजमान आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अशातच हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या घरात विराजमान आहेत. ज्यामुळे समसप्तक राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. तसेच मंगळ ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीला साहस, आत्मविश्वास प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि मंगळाचा समसप्तक राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
समसप्तक राजयोग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी प्राप्त करण्यात सक्षम असाल. या काळात भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी समसप्तक राजयोग खूप सकारात्मक ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा -आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन