-
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्माची तारीख खूप महत्त्वाची असते. जन्म तारीख व्यक्तीच्या जीवनाविषयी आणि करिअरविषयी अनेक गोष्टी सांगते. तसेच काही अकं आपल्यासाठी लकी असतात तर काही अनलकी असतात. (Photo : Freepik)
-
आज आपण मूलांक ८ विषयी जाणून घेणार आहोत ज्याचा संबंध थेट न्यायाधीश शनिदेवाशी येतो. म्हणजेच ज्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या ८, १७, आणि २६ तारखेला असतो, त्यांचा मूलांक ८ असतो. (Photo : Freepik)
-
ज्या लोकांवर मूलांक ८ चा प्रभाव असतो त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा दिसून येते. हे लोक अतिशय मेहनती आणि चांगले कर्म करणारे असतात. हे लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. मूलांक ८ शी संबंधित माहिती जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
मूलांक ८ असणाऱ्या लोकांवर शनिदेवाची विशेष आशीर्वाद दिसून येतो. तसेच हे लोक खूप जास्त मेहनती आणि चांगले कर्म करणारे असतात. या लोकांजवळ खूप जास्त धन संपत्ती असते. (Photo : Freepik)
-
या लोकांना बालपणी खूप कमी सुख प्राप्त होते. तसेच या लोकांचे नशीब वयाच्या ३० व्या वर्षानंतर चमकते. म्हणजेच हे लोक नेहमी साधे जीवन आणि उच्च विचारांनी जगतात. (Photo : Freepik)
-
मूलांक ८ शी संबंधित लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला आवडते. (Photo : Freepik)
-
या लोकांना आळशीपणा आवडत नाही. या लोकांना खोटी स्तुती करणारे आवडत नाही आणि हे लोक सुद्धा कोणाची खोटी स्तुती करत नाही. (Photo : Freepik)
-
हे लोक त्यांच्या शक्तीचा कमी वापर करतात. मूलांक ८ असणाऱ्या लोकांना खूप व्यवस्थितरित्या गोष्टी हाताळणे आवडते. त्यांना वस्तू पसरलेल्या आवडत नाही. (Photo : Freepik)
-
ते लोक खूप व्यवसायी असतात. ते लोक कधी कधी खूप आस्थावादी असतात तर कधी कधी ते अनास्थावादी सुद्धा असतात. (Photo : Freepik)