-
हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी अनेक उपाय सुचविले जातात.
-
यापैकी काही मूलभूत उपाय हिवाळ्याच्या या हंगामामध्ये आपल्या शरीराचे नक्कीच रक्षण करेल.
-
कपडे कोणते घालायचे – हिवाळ्यात सर्वप्रथम थर्मल कपडे परिधान करावे. यावर स्वेटर किंवा जॅकेट घालून शरीराला उबदार बनविण्यात मदत करते.
-
सूर्यकिरण गरजेचे – जीवनसत्व डीचे सेवन वाढवण्यासाठी हिवाळ्यात सूर्यप्रकाश मिळणे महत्त्वाचे आहे.
-
शरीराला उष्णता देणारे अन्न – हिवाळ्यात शरीराला उष्णता देणाऱ्या अन्नाचे सेवन केल्यास कोणत्याही आजाराला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होते. हळद, मध, आलं, इलायची, काजू, मिरी, अंडं या पदार्थांचा नियमित आहारात समावेश करणे फायद्याचे ठरेल.
-
योग्य पाणीपुरवठा – हिवाळ्यात पाण्याची तहान क्वचितच लागते. परंतु, या दिवसात शरीरात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात पोहोचणे गरजेचे असते. हर्बल चहा, सूप किंवा कोमट पाणी याचे सेवन केल्यास फायद्याचे ठरेल.
-
झोपताना सॉक्स परिधान करणे – उबदार तळवे शरीराला ऊब देण्यात मदत करतात. त्याचबरोबर हिवाळ्यात सॉक्स परिधान केल्यामुळे शांत झोप लागते.
-
जीवनसत्व बी १२ चे सेवन – अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या यामध्ये जीवनसत्व बी १२ सारखे अनेक पोषक सत्व असल्याने या अन्नाचे सेवन केल्यास शरीराला ताकद मिळते.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…