-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरू सध्या वृषभ राशीत असून तो १४ मे २०२५ रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या राशीत गुरू एक वर्ष राहील. त्यामुळे या राशीत गुरू आणि शुक्राची युती निर्माण होईल, गुरू-शुक्राची युती गजलक्ष्मी राजयोग निर्माण करते. हा योग अत्यंत शुभ आणि भाग्यकारी मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल. जो या राशीत २१ ऑगस्टपर्यंत अस्त राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश होताच हो योग निर्माण होईल. ज्याचा काही राशींवर शुभ प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या राशीच्या अकराव्या घरात ही युती निर्माण होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना गजलक्ष्मी राजयोग भाग्यकारी ठरेल. हा योग तूळ राशीच्या नवव्या घरात निर्माण होत आहे. त्यामुळे या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या राशीच्या सातव्या घरात हा योग निर्माण होईल. या योगाच्या प्रभावाने तुमच्या देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य