-
महिलांना स्ट्रेट केस खूप आवडतात. पण पार्लरमध्ये जाऊन किंवा स्ट्रेटनरच्या मदतीने केस स्ट्रेट करता तेव्हा ते कमकुवत आणि निर्जीव होऊ लागतात. ज्यामुळे केस गळतीची समस्या वाढू लागते. अशावेळी एखाद्या पार्टी किंवा कार्यक्रमाला जाताना केस स्ट्रेट करताना भीती वाटते.
-
यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स घेऊन आलोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी नैसर्गिकरित्या तुमचे केस सहजपणे स्ट्रेट करू शकता. यामुळे तुमचे केस स्ट्रेट करत होतीलच पण ते मजबूतही होतील.
-
खोबरेल तेल आणि लिंबाचा रस : केस स्ट्रेट, चमकदार, मजबूत, निरोगी आणि मॉइश्चरायझ्ड बनवण्यासाठी खोबरेल तेल आणि लिंबाचा रस खूप फायदेशीर आहे. यामुळे केसांतील कोंडा आणि खाज देखील दूर होते. यामुळे केसांना आवश्यक पोषण आणि आर्द्रता मिळते, ज्यामुळे तुमचे केस मजबूत होतात.
-
बदाम तेल आणि दही: बदाम तेल आणि दह्याचे मिश्रण केसांना लावण्याचे अनेक फायदे आहेत. केस स्ट्रेट करण्यासाठी हे फायदेशीर आहे. हे मिश्रण घरी तयार करण्यासाठी, बदाम तेल घ्या त्यात दही मिसळा, हे मिश्रण केसांवर ३० मिनिटे ते १ तास ठेवा आणि नंतर केस धुवा.
-
कोरफडीचे जेल: कोरफडीमध्ये अनेक एंजाइम असतात, जे केस स्ट्रेट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. केसांना कोरफडीचे जेल लावल्याने केस मॉइश्चरायझ होतात आणि ते निरोगी देखील होतात. कोरफडीचे जेल केसांना ३० मिनिटे ते १ तास लावा आणि नंतर थंड पाण्याने केस धुवा.
-
रोलर्स वापरणे: केस सरळ करण्यासाठी, रोलर्स किंचित ओल्या केसांवर लावा आणि काही काळ तसेच ठेवा, यामुळे तुमचे केस सहज सरळ होतील. रोलर्स वापरल्याने केसांना आवश्यक आकार आणि चमक मिळते, ज्यामुळे केस स्ट्रेट आणि सुंदर राहतात.
-
हेअर मास्क : हेअर मास्क वापरून केस सरळ आणि चमकदार बनवता येतात. हेअर मास्कमध्ये नारळाचे तेल, नारळाचे दूध, आवळा, शिकाकाई, लिंबाचा रस, मध, बदाम तेल आणि दही अशा विविध नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. हे मिश्रण केसांना आवश्यक पोषण आणि आर्द्रता प्रदान करते, ज्यामुळे केस सरळ, चमकदार आणि निरोगी बनण्यास मदत होते. हेअर मास्क वापरण्यासाठी, हे मिश्रण तुमच्या केसांना लावा, ३० मिनिटे ते १ तास तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख