-
काही काळापासून जगभरात बर्ड फ्लूबाबत चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्लूची लागण झाली आहे. बर्ड फ्लूमुळे देशभरात कोंबड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि किरकोळ विक्रेते व रेस्टॉरंट्समध्ये अंडी व चिकनयुक्त पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. (PHOTO: FreepiK)
-
संशोधकांनी यावर भर दिला आहे की, बर्ड फ्लू अजूनही सामान्य लोकांसाठी कमीत कमी धोका दर्शवितो. परंतु, अंड्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये अंडी पुरवठ्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अशा वेळी बर्ड फ्लूदरम्यान अंडी आणि चिकन खाणे कितपत सुरक्षित आहे ते जाणून घेऊ…(PHOTO: FreepiK)
-
गेल्या आठवड्यात, देशातील सर्वांत मोठ्या अंडी उत्पादकांपैकी एकाने सांगितले की, त्याच्या इंडियाना फार्ममधील कोंबड्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझासाठी सकारात्मक चाचणी झाली होती.(PHOTO: FreepiK)दरम्यान, या संदर्भात वॉशिंग्टन, डी.सी.मधील पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि सल्लागार डॉ. गेल हॅन्सन यांनी सविस्तर माहिती दिली आहे. (PHOTO: FreepiK)
-
“मेलेले पक्षी अंडी घालत नाहीत, तसेच जेव्हा विषाणू एखाद्या कोंबड्यांच्या थव्यावर परिणाम करतो तेव्हा त्यांची अंडी सामान्यतः अन्नपुरवठ्यातून काढून टाकली जातात. शास्त्रज्ञ अजूनही हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत की, विषाणूमुळे दूषित झालेली कोंबड्यांची उत्पादने खाण्याने किंवा त्यांचे द्रवरूप पदार्थ सेवन करण्याने मानवांना बर्ड फ्लू होऊ शकतो का?(PHOTO: FreepiK)
-
२०२४ पासून युनायटेड स्टेट्समध्ये संक्रमित झालेल्या कमीत कमी ६६ लोकांपैकी बहुतेकांना आजारी प्राण्यांच्या संपर्कातून विषाणूचा संसर्ग झाला असला तरीही असे दिसते की, विषाणू काही खाद्यपदार्थांद्वारे प्रसारित केला जाऊ शकतो.
-
विषाणू असलेले कच्चे दूध प्यायल्यानंतर माकडे आजारी पडली आहेत. दूषित दूध आणि न शिजविलेले पदार्थ खाल्ल्याने पाळीव मांजरींचा मृत्यू झाला आहे.(PHOTO: FreepiK)
-
हा विषाणू विशेषत: गाईंच्या कासेमध्ये आढळतो, याचा अर्थ असा होतो की, गरम न केलेल्या दुधात विषाणूचे प्रमाण जास्त असू शकते, असे सेंट ज्यूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलमधील विषाणूशास्त्रज्ञ आणि इन्फ्लूएंझा तज्ज्ञ स्टेसी एल. शल्ट्झ-चेरी यांनी सांगितले. मॅसॅच्युसेट्स ॲमहर्स्ट विद्यापीठातील अन्न विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक मॅथ्यू मूर म्हणाले, “अंड्यांतून बर्ड फ्लू होण्याची शक्यता अजूनही खूपच कमी आहे. अंडी पूर्णपणे शिजवल्याने विषाणू नष्ट होतात.(PHOTO: FreepiK)
-
रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे १६५ अंशांच्या अंतर्गत तापमानात अंडी उकडण्याची वा शिजवण्याची शिफारस करतात. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मेघन डेव्हिस म्हणाले, जर तुम्ही अंडी पूर्णपणे शिजवत असाल, तर धोका अत्यंत कमी आहे.”(PHOTO: FreepiK)
-
दरम्यान हे संक्रमण विशेषतः लहान मुले, वयस्कर प्रौढ, गरोदर स्त्रिया आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांसाठी गंभीर असू शकते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.(PHOTO: FreepiK)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”