-
बीट हे पोषक आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध अशी कंदमूळ भाजी (a root vegetable) आहे. ज्याचे सेवन करणे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
-
मधुमेहींनी बीटचे सेवन करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. व्ही मोहन यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “बीटमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. विशेषतः त्यात व्हिटॅमिन सी मुलबक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे.
-
बीटमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हिवाळ्यात तुम्हाला ते उबदार ठेवते. परंतु, ही कंदमूळ भाजी असल्याने त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते आणि ती पिष्टमय मानली जाते (प्रति १०० ग्रॅम वजनाच्या बीटमध्ये चार ग्रॅमपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स असतात). ही एक पिष्टमय भाजी आहे, जी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असल्यामुळे ती तुम्ही कमी प्रमाणात खाऊ शकता.
-
बीटचे सेवन केल्याने रक्तातील सारखेवर नियंत्रित करता येईल का?
बीटमधील ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम म्हणजे ६० इतके आहे. एखादे अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील साखर रक्तप्रवाहात किती लवकर सोडते याचे मोजमाप म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. परंतु, बीटमध्ये तंतू असतात, जे केवळ वजन वाढवतात आणि बीटचे पचन होण्यास वेळ लागतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे उत्सर्जन कमी होते; परंतु भुकेची जाणीव कमी होते. -
बीटमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, लोह व बायोअॅक्टिव्ह संयुगे असतात. त्यात फायटोकेमिकल्स असतात, जी रक्तातील साखर आणि इ्न्सुलिनचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यात कॅरोटिनॉइड्स असतात, ज्यांचे शरीर व्हिटमॅन एमध्ये रूपांतर करते.
-
बीट अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्याने, ते मधुमेहाची गुंतागुंत कमी करू शकते. तसेच मज्जातंतू आणि डोळ्यांचे नुकसान, मूत्रपिंडाचे आजार, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्या टाळण्यास मदत करते.
-
बीट्समध्ये असलेला एक घटक नायट्रेट (आपल्या शरीरात चयापचय झाल्यानंतर किंवा अन्नावर प्रक्रिया केल्यानंतर शिल्लक राहणारा पदार्थ) इन्सुलिनचा प्रतिकार कमी करू शकतो, असे काही पुरावे आहेत
-
. २०१७ मधील एका छोट्या अभ्यासात, “लठ्ठपणा असलेल्या सहभागींनी, ज्यांनी बीटचा रस आणि कार्बोहायड्रेट्सचे मिश्रण सेवन केले. त्यांच्यामध्ये लठ्ठपणा नसलेल्या सहभागींपेक्षा कमी इन्सुलिन प्रतिरोधकता दिसून आली.”
-
२०१४ मध्ये आधीच्या एका अभ्यासात असेही दिसून आले होते, “जेवताना बीटचा रस पिणाऱ्यांना जेवणानंतर इन्सुलिन आणि ग्लुकोजची प्रतिक्रिया कमी होते. पण, नमुन्याचा आकार लहान असल्याने अधिक मोठ्या प्रमाणावर अभ्यास आवश्यक आहे.”
-
बीटचे सेवन कसे करावे? (How to have beetroot?)
बीटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने, ते जास्त शिजवू नका. कारण- त्यामुळे पोषक घटकांची हानी होते. त्याऐवजी कच्चे बीट घ्या. रक्तातील साखर कमी करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या घेणे आणि प्रत्येक जेवणसह त्याचे सेवन करा. -
एक कप कच्च्या बीटमध्ये १२ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, ९.१९ ग्रॅम साखर, ३.८ ग्रॅम आहारातील फायबर आणि २.२ ग्रॅम प्रथिने असतात. मधुमेहींनी फक्त अर्धा कप बीटचे सेवन करा
-
वे. इतर तंतुमय भाज्यांसह बीट सेवन करा आणि सेवन करताना संयम राखणे आवश्यक आहे. (सौजन्य – सर्व फोटो फ्रिपीक) ( (हेही वाचा –तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…)
माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन, महसूलमंत्र्यांसोबतची भेट ठरली अखेरची