-
सकाळच्या वेळी मुलांना शाळेत सोडणे, घरातील जेवण बनवणे, ऑफिसला जाणे या सर्व कामांमध्ये बहुतेक लोकांसाठी सकाळची वेळ खूप घाई-गडबडीची असते.
(फोटो सौजन्य: Freepik) -
परंतु, त्यातूनही जर तुम्ही श्वासोच्छ्वासाच्या व्यायामासाठी थोडा वेळ काढला, तर ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, असं गॅरी ब्रेका म्हणाले.
(फोटो सौजन्य: Freepik) -
त्यांच्या मते, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम खूप फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः सकाळी उठल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत. “हे डोपामाइन वाढवते. ते तुमचा मूड, भावनिक स्थिती सुधारते. तुमचा डायफ्राम तुमच्या आतड्यांना मालिश करतो. त्याशिवाय तुमच्या रक्तात ऑक्सिजन भरला जातो. त्यामुळे दिवसभर तुम्हाला उत्साही वाटते”.
(फोटो सौजन्य: Freepik) -
ब्रेका म्हणाले, “त्यासाठी घराबाहेर जा. ३० वेळा श्वास घेण्याच्या तीन फेऱ्या करा आणि तीन सेटमध्ये श्वास रोखून ठेवा.”
(फोटो सौजन्य: Freepik) -
झोपताना आपण सक्रियतेने खोलवर श्वास घेत नाही. “म्हणून जेव्हा तुम्ही जागे झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घेता तेव्हा तो व्यायाम तुमच्या शरीर आणि मनासाठी चमत्कार ठरू शकतो,” असे ‘हबिल्ड’चे संस्थापक व प्रमाणित योग प्रशिक्षक सौरभ बोथरा म्हणाले.
(फोटो सौजन्य: Freepik) -
झोपेतून उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत अनुनासिक किंवा नाकाच्या श्वसनाचा व्यायाम (nasal breathing exercises) करणे महत्त्वाचे आहे. “हा व्यायाम तुमच्या शरीरासाठी नैसर्गिक अलार्मप्रमाणे काम करतो.” असे बोथरा यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“ध्यानपूर्वक अनुनासिक श्वास घेणे हा ध्यानाचा सर्वात सोपा प्रकार आहे. काही मिनिटांच्या अनुनासिक श्वासाने सुरुवात केल्याने एकूण आरोग्य लक्षणीय फरक पडू शकतो,” असे डॉ. सिन्हा म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“हा व्यायाम फुप्फुसांची क्षमता मजबूत करतो, स्थिर हृदय गतीला समर्थन देऊन, दिवसभर शरीराला काम करण्यासाठी तयार करतो,” असे डॉ. सिन्हा म्हणाले.
(फोटो सौजन्य: Freepik) -
तुमच्याकडे ५ मिनिटे असोत किंवा ३० मिनिटे असो; तुम्ही सकाळच्या दिनचर्येत श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे फायदेशीर आहे (फोटो सौजन्य: Freepik)

Pune Swargate Rape Case Live Updates : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”