-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, शनी २८ फेब्रुवारी रोजी स्वराशी असलेल्या कुंभ राशीमध्ये अस्त होणार असून तो तब्बल ३७ दिवसांपर्यंत अस्त राहून ६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून ५ पुन्हा उदित होणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
यादरम्यान, शनी मीन राशीत प्रवेश करेल. शनीची उदित अवस्था खूप खास मानली जाते. ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी शनीची ही स्थिती अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात हवे तसे यश मिळेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींनाही शनीची ही अवस्था खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना शनीची ही स्थिती भाग्यदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
VIDEO: “डोळे उघडले तेव्हा मी देव माशाच्या तोंडात होतो” तरुणाला जिवंत गिळलं; पण पुढच्याच क्षणी जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही